actor shahrukh khan : शाहरूख खान आर्यनला भेटण्यासाठी ऑर्थर रोड कारागृहात | पुढारी

actor shahrukh khan : शाहरूख खान आर्यनला भेटण्यासाठी ऑर्थर रोड कारागृहात

पुढारी ऑनलाईन डेस्क

actor shahrukh khan : मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सापडला. यानंतर त्याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. मागच्या दोन आठवड्यापासून अटकेत असलेल्या आर्यनला भेटण्यासाठी शाहरूख खान गेला. शाहरूख आणि आर्यन यांच्यात तब्बल ३० मिनीटे चर्चा झाली.

आज सकाळी ९ वाजता (दि.२१) तो ऑर्थर रोड कारागृहामध्ये पोहोचला. त्याला भेटण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.
दरम्यान शाहरूख खान आणि आर्यन यांच्यात कोणती चर्चा झाली याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आले नाही. शाहरूख सोबत कोणीही घरचे कोणीही नसल्याचे दिसून आले. तो ऑर्थर रोड कारागृहमध्ये येताना कोणताही गाजावाजा न करता छोट्याशा वाहनातून गुपचुप आल्याने कारागृह परिसरात अचानक गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

actor shahrukh khan : आज जामीनावर सुनावणी

मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्‍या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्‍यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्‍यान, आर्यन खानच्‍या फोनमधील मेसेज एनसीबी आज न्‍यायालयात सादर करणार आहे. या मेसेजमध्‍ये त्‍याचे ड्रग्‍ज विक्रेत्‍यांबरोबर संवाद असल्‍याचा दावा एनसीबीने केला आहे.

२ ऑक्‍टोबर रोजी मुंबईतील एक क्रुझवरील रेव्‍ह पार्टींवर (drug case : ) एनसीबीने छापा टाकला होता. यावेळी आर्यन खान, अरबाज मर्चेंटसह सहा जणांना ताब्‍यात घेण्‍यात आले होते. यानंतर याप्रकरणी आर्यन खानसह आठ जणांना अटक करण्‍यात आली. यामध्‍ये दोन युवतींचाही समावेश आहे. न्‍यायालयांनी सर्व संशयित आरोपींना न्‍यायालयीन कोठडी सुनावल्‍यानंतर सर्वांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्‍यात आली होती.

आर्यनचा मुक्काम वाढणार?

१४ ऑक्‍टोबर रोजी जामीन अर्जावरील सुनावणीवेळी न्‍यायालयाने २० ऑक्‍टोबरपर्यंत यावरील निर्णय राखीव ठेवला आहे. त्‍यामुळे आर्यन खानचा आर्थर रोड कारागृहातील मुक्‍काम वाढला होता.

 

Back to top button