Shubman Gill : शुबमन गिलचा ऑरेंज कॅपवर कब्जा, फाफ डुप्लेसीला टाकले मागे | पुढारी

Shubman Gill : शुबमन गिलचा ऑरेंज कॅपवर कब्जा, फाफ डुप्लेसीला टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने आयपीएलच्या १६ व्या हंगामात धमाकेदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. मुंबईविरुद्धच्या क्वालिफायर २ सामन्यातही त्याने शानदार अर्धशतक झळकावले आणि गुजरात संघाला चांगली सुरुवात करून दिली. दरम्यान, या सामन्यात त्याने ९ धावा करताच आयपीएललमधील ऑरेंज कॅपवर कब्जा केला. या पूर्वी ही कॅप आरसीबीच्या फाफ डुप्लेसीकडे (७३०) होती. पण आता त्यावर शुबमन गिलने आपले नाव कोरले आहे. (Shubman Gill)

शुभमन गिलने १६ सामन्यांमध्ये ८५१ धावा करत डु प्लेसिसला मागे सोडत ऑरेंज कॅप आपल्या नावे केली. डु प्लेसिसने यंदाच्या हंगामात १४ सामन्यांमध्ये ७३० धावांसह ऑरेंज कॅपच्या यादीमध्ये पहिल्या स्थानी होता. मुंबईविरूध्दच्या सामन्यात ९ धावा करत तो यादीच्या पहिला स्थानावर पोहोचला. यासह डु प्लेसिस यादीच्या दुसऱ्या स्थानी घसरण झाली. या .यादीच्या तिसऱ्या स्थानी बेंगलोरचा विराट कोहली आहे. त्याने १४ सामन्यांमध्ये ६३९ धावा केल्या आहेत. (Shubman Gill)

आयपीएल २०२३ मध्ये शुभमन गिलची कामगिरी

शुभमन गिलने यंदाच्या हंगामात क्वालिफायर सामन्यापर्यंत १५ सामन्यांमध्ये ७२२ धावा केल्या होत्या. यामध्ये २ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. या खेळींमध्ये त्याने ७१ चौकार आणि २३ षटकार लगावले आहेत. शुभमन गिलने बेंगलोरविरूध्दच्या शेवटच्या साखळी सामन्यात त्याने हंगामातील सर्वात्तम खेळी केली होती. यांमध्ये त्याने नाबाद १०४ धावांची खेळी केली होती.

आयपीएल २०२३ मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

  • शुभमन गिल – १६ सामने – ८५१ धावा
  • फाफ डु प्लेसिस – १४ सामने – ७३०
  • विराट कोहली – १४ सामने – ६३९ धावा
  • डेवॉन कॉनव्हे – १५ सामने – ६२५ धावा
  • यशस्वी जयस्वाल – १४ सामने – ६२५ धावा

हेही वाचा;

Back to top button