Matthew Hayden : ‘धोनी हा जादूगार, दुस-याच्या कचऱ्याला बनवतो सोनं’

Matthew Hayden : ‘धोनी हा जादूगार, दुस-याच्या कचऱ्याला बनवतो सोनं’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) संघ आयपीएल 2023 (IPL 2023)च्या अंतिम फेरीत पोहोचला असून एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली संघाने तबल विक्रमी 10व्यांदा ही कामगिरी केली आहे. सीएसकेच्या (CSK) यशानंतर ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटर मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) धोनीच्या कॅप्टन्सीचा चाहता झाला असून त्याने भारताच्या महान क्रिकेटरविषयी पीटीआयशी बोलताना मोठे विधान केले आहे.

'धोनी हा जादूगार'

'धोनी हा जादूगार आहे, जो दुसऱ्याच्या कचऱ्याचे सोन्यात रूपांतर करतो. स्पर्धेच्या सुरुवातीला संघाची गोलंदाजी कमकुवत होती पण धोनीने त्याचा सर्वोत्तम खेळ केला. फलंदाजीतही अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांचा ज्याप्रकारे त्याने वापर करून घेतला त्यावरून त्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे,' असे हेडनने त्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच धोनीच्या निवृत्तीबाबत हेडनने धक्कादायक विधान केले. तो म्हणाला, 'धोनी या स्पर्धेत गुडघ्याच्या दुखापतीसह खेळला. खेळाडू म्हणून आपले भविष्य ठरवण्यासाठी त्याने स्वत:ला आठ ते नऊ महिने दिले आहेत. मात्र, पुढील आयपीएलमध्ये तो मैदानात खेळताना दिसणार नाही, असेही स्पष्ट मत हेडनने (Matthew Hayden) मांडले.

हेडन पुढे म्हणाला, 'सीएसकेच्या यशात धोनीने इतके योगदान दिले आहे की एक खेळाडू म्हणून फ्रँचायझीशी त्याच्या भविष्याबद्दल बोलणे जवळजवळ निरुपयोगी आहे. तो एक अतिशय कार्यक्षम आणि सकारात्मक कर्णधार आहे. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन आणि त्याची टीम यांच्यातील समन्वय खूप मजबूत आहे.'

भविष्यात युवा खेळाडूंना संधी

'प्रत्येक ध्येय साध्य करण्यासाठी एक प्रक्रिया असते आणि धोनीने ती भारतीय संघासोबत आणि आता CSK सोबत दाखवून दिली आहे. ज्या खेळाडूंनी जगभरातील फ्रँचायझी क्रिकेट खेळण्यासाठी राष्ट्रीय करार सोडला आहे त्यांना दोष देता येणार नाही. आगामी काळात युवा खेळाडूंना क्रिकेट खेळायचे असेल तर ते फ्रँचायझी क्रिकेटच खेळतील, हे निश्चित,' असेही भाकीत हेडनने (Matthew Hayden) केले.

'कसोटी क्रिकेटसाठी उत्साह'

हेडनने असेही सांगितले की, जगभरात टी-20 क्रिकेटचा ट्रेंड वाढत असल्याने खेळाडूंना तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणे कठीण झाले आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा काळ आता संपणार आहे. कसोटी क्रिकेट खेळण्याचा उत्साह खूप आहे आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिप हे त्याचेच उदाहरण आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news