पुण्यातील निवृत्त पोलिसाची प्लॉटिंगमध्ये फसवणूक | पुढारी

पुण्यातील निवृत्त पोलिसाची प्लॉटिंगमध्ये फसवणूक

बारामती पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील निवृत्त पोलिसाच्या पत्नीला प्लॉट विकल्यानंतर त्यांनी केलेले तारेचे कुंपण काढून टाकत पुन्हा त्याच जागी प्लॉटिंग करत फसवणुकीचा प्रकार बारामती तालुक्यातील मोरगाव येथे घडला. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये वैभव पांडुरंग तावरे, पांडुरंग तावरे, अमित लक्ष्ण शेंडगे (रा. मगरपट्टा सिटी, हडपसर, पुणे), गणेश बाळासाहेब दगडे (रा. कासुर्डी, ता. भोर), फक्रुद्दीन अलीमहमंद बाबाजी, नफिसा फक्रुद्दीन बाबाजी, खोमेजा फक्रुद्दीन बाबाजी आणि अली महमंद बाबाजी (रा. फक्रीहील्स, लुल्लानगर, कोंढवा, वानवडी रोड, पुणे) यांचा समावेश आहे. सुजाता रमेश सणगर (रा. आंबेगाव पठार, कात्रज, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली.

फिर्यादीचे पती 2017 मध्ये पोलिस खात्यातून निवृत्त झाले. 2018 मध्ये हडपसरच्या श्री महालक्ष्मी डेव्हलपर्सच्या वैभव तावरे, पांडुरंग तावरे, अमित शेंडगे यांनी मोरगाव येथील गट क्रमांक 132-2 मधील 11 गुंठ्याचा प्लॉट फिर्यादी यांना 8 लाख रुपयांना दिला. ऑगस्ट 2018 रोजी केडगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात त्याचे खरेदीखत झाले.

बाबाजी परिवार या जागेचे मूळ मालक होते. त्यांनी फिर्यादीला खरेदीखत करून दिले. धनादेशाने त्यांना रक्कम देण्यात आली. त्यानंतर तावरे व शेंडगे यांनी सात-बारा, आठ अ उतारा तसेच खरेदीखताचे मूळ पेपर्स राहिलेली रक्कम दिल्यानंतर फिर्यादी यांच्या ताब्यात दिले. बाबाजी परिवाराने त्यांना प्लॉटिंगच्या ठिकाणी नेत मोजमाप करून दिले. फिर्यादीने त्या जागेला तारेचे कुंपन घालून पती व मुलाचा मोबाईल क्रमांक लिहीत तेथे फलक उभा केला.

Back to top button