मुंबईत श्वास घेणेही धोक्याचे | पुढारी

मुंबईत श्वास घेणेही धोक्याचे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा :  प्रजा फाऊंडेशनने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालाने मुंबई महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनाचे अक्षरशः वस्त्रहरण केले आणि मुंबईची हवा दिवसेंदिवस कशी श्वास घेण्याच्या लायकीची राहिली नाही हे तक्रारींच्या प्रचंड संख्येने दाखवून दिले. विशेषतः कोरोनाच्या साथीनंतर दूषित हवेच्या तक्रारी मुंबईत वाढल्या असल्या तरी हवा शुद्ध राहण्यासाठी कोणतेही ठोस उपाय महापालिका करताना दिसत नाही.

१२४% तक्रारी वाढल्या त्या केवळ कचऱ्याबद्दल. मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडलेले दिसते. कारण, कचरा उचलला नाही, तो तसाच पडून आहे, त्यातून दुर्गंधी सुटली, अशा तक्रारी गेल्या दहा वर्षांत १२४ टक्के वाढल्या. २०१३ मध्ये ५ हजार ५१९ तर २०२२ मध्ये याच तक्रारी १२३५१ वर पोहोचल्या.

२३७% वाढ हवेतील प्रदूषणाच्या तक्रारीमध्ये झाली. त्यातही २०१९ ते २०२२ या चार वर्षांत ही वाढ ३० टक्के आहे. मुंबईची हवा का बिघडते याचा शोध घ्या. विशेषतः त्यासाठी प्रभाग हाच घटक समजा, असे सांगूनही महापालिकेला समजत नाही. हवा बिघडत जाते आणि मुंबईकर त्याच हवेत श्वास घेत जगत राहतात.

Back to top button