राधानगरीतील पुंगावमध्ये ५९ हजारांचा गांजा जप्त, एकाला अटक | पुढारी

राधानगरीतील पुंगावमध्ये ५९ हजारांचा गांजा जप्त, एकाला अटक

राशिवडे; पुढारीवृतसेवा : राधानगरी पोलिसांनी सरवडे पाठोपाठ पुंगाव येथे तरुणाच्या घरावर छापा टाकून ५९ हजार ५२० रुपये किंमतीचा २ किलो ९०० ग्रँम गांजा जप्त केला. अमोल आनंदा पाटील (वय२७) असे या तरुणाचे नाव आहे. या कारावईनंतर तालुक्यात गांजा विक्रीचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दोन दिवसापुर्वी मालवे-बोरवडे रस्त्यावर ६७२८० रु. किमतीचा पावणेचार किलो गांजासह ७ मोटरसायकली, ११ मोबाईल असा सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करुन आठ जणांना अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच तालुक्यातील पुंगाव येथील अमोल आनंदा पाटील यांच्या घरातुन ५९ हजार ५२० रुपये किंमतीचा २किलो ९०० ग्रँम  गांजा राधानगरी पोलीसांनी जप्त करुन अमोल पाटील याला  अटक केले. चार दिवसात गांजावर पाठोपाठ दुसरी कारवाई झाल्याने तालुक्यात गांजाचा धुर मोठ्या प्रमाणात निघत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अधिक तपास पो.नि.स्वाती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एन.ए.खान, अरविंद पाटील आदी करत आहेत.

Back to top button