छत्रपती संभाजीनगर- पुणे शिवाई ई-बसला सुरूवात | पुढारी

छत्रपती संभाजीनगर- पुणे शिवाई ई-बसला सुरूवात

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्‍तसेवा : एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेल्या शिवाई ई बस या पहिल्या ई-बसची सेवा गुरुवारपासून (दि.18) सुरू झाली. मध्यवर्ती बसस्थानकावर सकाळी 11 वाजता औपचारिक उद्घाटन करून ही बस पुण्याला रवाना करण्यात आली. पहिल्याच दिवशी 45 प्रवाशांना घेऊन ही बस धावली.

एस.टी. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवासी यांच्या हस्ते या ई-बसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक, वाहतूक निरीक्षक यांच्यासह कर्मचारी उपस्थिती होते.

शिवशाही व शिवाईचे दर 515 रुपये, तर शिवनेरीसाठी मोजावे लागतात 750 रुपये…

छत्रपती संभाजीनगरला 5 आणि पुणे विभागात 5 अशा एकूण 10 बसेस मिळाल्या आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर ते पुणे या मार्गावर दहा बसेस उपलब्ध झाल्या आहेत. एका व्यक्तीला 515 रुपये तिकिट दर आकारण्यात येत आहे. शिवशाही बसने प्रवासासाठीही एवढेच पैसे पडतात. तर शिवनेरी बसच्या प्रवासासाठी 750 रुपये तिकिट दर आहे. त्यामुळे एसी सुविधा असलेल्या शिवशाही आणि शिवाई बसला प्रवाशांची पसंती अधिक मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दीड तासात फुल चार्ज तर 260 किलोमीटर धावणार

ई-शिवाई बसला फुल चार्ज करण्यासाठी दीड तास लागतात. यानंतर ही बस 260 किलोमीटर धावते. प्रत्यक्ष प्रवासी सेवेत उतरविण्याआधी या बसचा ड्राय रन घेण्यात आलेला आहे. यादरम्यान 55 मिनिटे ट्रॅफिक जॅममध्ये बस अडकली होती. यानंतरही पूर्ण प्रवासानंतर 70 टक्के बॅटरी संपली, तर 30 टक्के बॅटरी शिल्लक होती. त्यामुळे प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही, असे विभाग नियंत्रकांनी माहिती दिली.

.हेही वाचा 

गौरी गोसावी खून प्रकरण : आधी खोदला खड्डा…मग केला खून…पुरला मृतदेहही…पण…

‘land for jobs’ घोटाळा प्रकरणी राबडी देवी ‘ईडी’समोर हजर

त्र्यंबकेश्वरच्या भाविक पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती

Back to top button