ICSE Board Result 2023 : ICSE दहावी व ISC बारावीचा निकाल जाहीर; जाणून घ्या निकाल कुठे आणि कसा पाहायचा | पुढारी

ICSE Board Result 2023 : ICSE दहावी व ISC बारावीचा निकाल जाहीर; जाणून घ्या निकाल कुठे आणि कसा पाहायचा

पुढारी ऑनलाईन: भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषद (CISCE) या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (10 वी) आणि आयएससी (12 वी) च्या परीक्षेचा निकाल आज (दि.१४) दुपारी 3 वाजता जाहीर झाला. विद्यार्थी त्यांचे 10 वी आणि 12वीचे परीक्षेचे निकाल त्यांचा युनिक आयडी आणि इंडेक्स नंबर वापरून cisce.org वर ICSE चा आणि results.cisce.org वर  ISC चा निकाल तपासू शकतात.

ICSE (10 वी) ची परीक्षा 27 फेब्रुवारी ते 29 मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. तर ISC (12 वी) परीक्षा 13 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान झाली होती. या वर्षी सुमारे 2.5 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. आज दुपारी ३ वाजता या परिक्षेचा निकाल जाहीर झाला. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.

हेही वाचा:

Back to top button