शेतात असलेल्या सेफ्टी टॅंकची सफाई करताना ५ कामगारांचा मृत्यू | पुढारी

शेतात असलेल्या सेफ्टी टॅंकची सफाई करताना ५ कामगारांचा मृत्यू

सोनपेठ, पुढारी वृत्तसेवा : शहराजवळील गंगाखेड रोडजवळील भाऊचा तांडा शिवारातील आखाड्यावर असलेल्या सेफ्टी टॅंकची सफाई करताना ५ कामगांराचा मृत्यू झाला. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. ११) रात्री आठ ते नऊ च्या सुमारास घडली. दरम्यान, मयत पाचही जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, भाऊचा तांडा शिवारात असलेल्या मारुती दगडू राठोड (इंजिनियर) यांच्या आखाड्यावरील सेफ्टी टॅंक सफाईचे काम गुरुवारी सायंकाळच्या सुमारास चालू झाली. त्यांच्या सफाईचे काम चालू असताना शेख सादेक (४५), शेख शाहरुख (२०), शेख जुनेद (२९), शेख नवीद (२५), शेख फिरोज (१९) या पाच जणांचा मृत्यू झाला असून शेख साबेर (१८) जखमी झाला आहे. परळी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असून त्‍यांच्यावर उपचार सुरू आहेत.

स्‍थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्‍थळी दाखल झाले. तसेच या प्रकणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

.हेही वाचा 

दागिने लुटून वृध्देचा खून करणारा जेरबंद; मंचर पोलिसांची कामगिरी

काेकण वार्तापत्र : जलवाहतुकीचा नवा आरंभ

पुणे : नर्सिंग अभ्यासक्रमांमध्ये हवेत गुणात्मक बदल; रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टरांप्रमाणेच परिचारिकांचीही गरज

Back to top button