परभणी : रस्ता वरती तर दुकाने खाली सां. बा. उपअभियंत्याचा प्रताप; नियोजन शून्य कारभार | पुढारी

परभणी : रस्ता वरती तर दुकाने खाली सां. बा. उपअभियंत्याचा प्रताप; नियोजन शून्य कारभार

जिंतूर (परभणी), पुढारी वृत्‍तसेवा : शहरातील मुख्य रस्ता सध्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग जिंतूर यांच्यामार्फत सिमेंट रोडने मजबुतीकरण करण्यात येत आहे. परंतु येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे आणि उंटावरून शेळ्या हकण्याच्या प्रकारामुळे शहरातील मुख्य रस्ता हा दुकानांच्या दोन फूट वरी तर दुकाने खाली असा प्रताप समोर आला आहे. यामुळे जिंतूर शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज संकुल यातील दुकानांमध्ये येत्या पावसाळ्यामध्ये मोठा दुष्परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वास्तविक सार्वजनिक बांधकाम खात्याकडून रस्त्याचे लेवल पाण्याचा उतार याचा परिपूर्ण अभ्यास करून या रस्त्याची उभारणी होणे गरजेचे असताना येथील उपविभागीय अभियंता मात्र नांदेड येथे बसून आपला कारभार रामभरोसे पणे जिंतूरात चालवीत आहेत. आणि म्हणूनच की काय दुकाने खाली आणि रस्तावर अशा प्रकारचा कारभार जिंतूर येथे दिसून येत आहे. एका मोठ्या ठेकेदाराकडून जिंतूर शहरात उत्तम प्रकारचं डांबरीकरण सिमेंट करण रस्ता होत आहे.

मात्र येथील बांधकाम खात्याचे उपअभियंता यांच्या नियोजन शून्य कारभाराचा परिणाम जिंतूर शहरकरांना भोगाव लागणार आहे. कारण पावसाळ्याचे दिवस जवळ येत असतानाच हा सिमेंट रस्ता होत आहे. हे उत्तम जरी असले तरी रस्त्यावर आणि दुकाने खाली या प्रकारामुळे दुकानदारांचे लाखोचे नुकसान होण्याचे संकेत दिसून येत आहेत या प्रकाराबद्दल खऱ्या अर्थाने सार्वजनिक बांधकाम खात्याकडून योग्य प्रकारे सर्वेक्षण होऊन काम होणे जरुरी होते परंतु तसे होताना दिसून येत नाही.

शहरातील अश्वरुढ छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्या अवतीभवती सर्व व्यापारी दुकाने आहेत. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागा तर्फे होत असलेल्या सिमेंट काँक्रेट रस्त्याचे काम हे सदोष पूर्ण असल्याचे प्रथम दर्शनी वाटते.कारण सदरील रस्त्याची मागणी व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या भवती व परिसरातील रस्त्यावर पूर्ण खड्डे पडलेले आहेत.तेंव्हा या रस्त्याच्या मागणी साठी वेळोवेळी संभाजी ब्रिगेड तर्फे मागणी केलेलीच आहे.सध्या होणारा शहरातील रस्ता करण्या पूर्वी आवश्यक खोदकाम केलेले नाही.परिणामी होणाऱ्या रस्त्याची उंची जास्त होत असल्याने रस्त्या लगत असणाऱ्या असंख्य दुकानात पावसाळ्यात पाणी शिरणार अशी भीती वाटत आहे.तेंव्हा वरिष्ठ बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्याने आवश्यक त्या सूचना काम करणाऱ्या यंत्रणेस द्यावे.
– बालाजी शिंदे( सोसकर), विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड

.हेही वाचा 

जळगाव : शेवटची इच्छा पूर्ण झाली म्हणत आईने सोडले प्राण

Adani-Hindenburg report : अदानी संदर्भातील तज्ज्ञ समितीचा अहवाल सादर; सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणीची शक्यता

Stock Market Closing | सेन्सेक्स १७८ अंकांनी वाढून बंद, निफ्टी १८,३०० वर, ‘हे’ शेअर्स होते टॉप गेनर्स

Back to top button