नाशिक : वणीत दुर्मीळ जातीचा ‘धुळ नागीण’ सर्प पकडला | पुढारी

नाशिक : वणीत दुर्मीळ जातीचा 'धुळ नागीण' सर्प पकडला

अनिल गांगुर्डे, वणी (जि. नाशिक)

वणी येथील सर्प मित्र भगवान पवार यांनी दुर्मिळ म्हणून ओळखला जाणारा अल्बीनो जातीचा धुळ नागीण सर्प येथील एका दुकानात पकडला. जिल्ह्यात पहिल्यांदाच या जातीचा साप आढळून आला आहे.

सर्प आढळताच सर्प मित्र भगवान पवार यांना फोन करुन बोलविण्यात आले. येथील एका दुकानाच्या पुढच्या भागातील फरशीच्या पोकळीत हा साप जाऊन बसला होता. त्यांनी तो सुरक्षित पकडला व बरणीत ठेवला. या सापा बाबत त्यांनी उपस्थितांना माहितीही दिली. हा साप अल्बीनो जातीतील धुळ नागीण प्रकारातील आहे. हा साप बिनविषारी आहे, परंतु लाखात एक असा सापडतो. रंग भुरकट डोळ्यांचा रंग गडद लाल, जिभेचा रंग ही लाल असतो. यापुर्वी अल्बीनो जातीची मन्यार ही लखमापुर येथे आढळून आली होती. ती ही सुरक्षित पकडून जंगलात सोडण्यात आली होती. तसेच पकडण्यात आलेली धुळ नागीण वणी येथील जंगलात सोडण्यात आली.

दरम्यान सापांच्या दुर्मीळ जाती वणी परिसरात आढळून येत आहे. या सापांना सुरक्षित पकडून जगंलात सोडण्याचे काम सर्पमित्र करतात. भगवान पवार हे वणी परिसरातील प्रचलित असे सर्पमित्र असून आता पर्यंत त्यांनी हजारो साप पकडून जंगलात सोडून दिले असल्याचे ते सांगतात. अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार दिले आहे. साप पकडला की, त्या सापाची ओळखही ते लोकांना करुन देत असतात.

हेही वाचा : 

Back to top button