नगर : श्रीरामपूर रेल्वे दुहेरीकरण कामास प्रारंभ | पुढारी

नगर : श्रीरामपूर रेल्वे दुहेरीकरण कामास प्रारंभ

शिरसगाव (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूरलगत इंदिरानगर परिसराजवळ मध्य रेल्वेकडून बेलापूर स्टेशन हद्दीत दुहेरी रेल्वे लाईन टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. बाजूला विजेचे खांबसुद्धा रेल्वे विभागाकडून मशिनरीद्वारे जलदगतीने उभे करण्याचे काम सुरू आहे. अनेक वर्षांपासून दौंड- मनमाड रेल्वे मार्गाकडे दुर्लक्ष झाले होते. या मार्गावर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या धावतात.

सिंगल लाईन असल्याने समोरून येणार्‍या गाड्यांना जाण्यास कोणत्या तरी स्टेशनवर बाजूला थांबावे लागल्याने ‘क्रॉसिंग’मुळे प्रवासास विलंब होत असे. आता विलंबाची वेळ संपुष्टात आली आहे. या कामाला आणखी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या मनमाड ते पढेगाव दुहेरीकरण प्रगतीपथावर आहे.

Back to top button