पुणे : लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी मिनीबस पेटून खाक | पुढारी

पुणे : लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी मिनीबस पेटून खाक

पिरंगुट (पुणे) : पुढारी वृत्तसेवा

पुणे मिनीबस पेटून खाक : लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या मिनीबसने (MH12NX5489) भुगाव (ता.मुळशी जि.पुणे) जवळ अचानक पेट घेतल्याने जळून खाक झाली. सुदैवाने सर्व वऱ्हाडी सुखरूप आहेत. १७ सिटर मिनी बसने हे वऱ्हाडी पिरंगुटकडून हडपसरला निघाले होते अशी माहिती गाडीचे मालक सागर भाग्यवान कवडे (३३ वय, रा धायरी फाटा ता.हवेली) यांनी दिली.

यामध्ये बारा लोक प्रवास करत होते या गाडीत एक घरगुती वापराचा भरलेला गॅस सिलेंडर होता. गाडीच्या रेडिएटर जवळुन धूर यायला लागल्यानंतर चालकाने ताबडतोब गाडी बाजूला घेऊन आतील सर्व प्रवासी बाहेर उतरवले आणि काही क्षणातच या गाडीने पेट घेतला. दरम्यान कोणतीही जीवित हानी झाली नाही.

पुणे मिनीबस पेटून खाक : चालकाच्या

चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्वांचे जीव वाचले. ही मिनी बस गाडी मालक यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करायची. लॉकडाऊन काळामध्ये गाडी खूप दिवस उभी होती.

यामुळे गाडीत बिघाड झाल्याचे न समजल्याने हा प्रकार घडल्याचे गाडी चालकाचे म्हणणे आहे.

दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पिरंगुट कडून येणारी वाहतूक दुसऱ्या बाजूने फिरवण्यात आली. तसेच वाहतूक सुरळीत करण्यास स्थानीकांनी मदत केली.

आग विझवण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे २ आणि परांजपे फॉरेस्ट ट्रेल्स येथील एक अशा तीन अग्निशामक दलाच्या वाहनांनी आग आटोक्यात आणली.

Back to top button