Satara APMC Election : बाजार समिती निवडणुकीत शिवेंद्रराजे गटाकडून उदयनराजे प्रणित स्वाभिमानी विकास आघाडीचा धुव्वा | पुढारी

Satara APMC Election : बाजार समिती निवडणुकीत शिवेंद्रराजे गटाकडून उदयनराजे प्रणित स्वाभिमानी विकास आघाडीचा धुव्वा

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील अजिंक्य विकास पॅनेलने खासदार उदयनराजे भोसले यांचा पाठिंबा असलेल्या स्वाभिमानी विकास आघाडीचा १८-० असा धुव्वा उडवला. त्यामुळे सातारा तालुक्यातील सहकारातील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

सातारा बाजार समितीसाठी रविवारी तब्बल ९४ टक्के मतदान झाले होते. सोमवारी सकाळी दहा वाजता जरंडेश्वर नाका येथील नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या सभागृहात मतमोजणी सुरुवात झाली. पहिल्या तासाभरामध्ये व्यापारी आणि हमाल मापाडी मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला. यामध्ये व्यापारी मतदारसंघांमध्ये क्रॉस वोटिंग झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र त्याचा फारसा काही परिणाम आमदार गटाच्या विजयी उमेदवारांवर झाला नाही.

यानंतर सोसायटी आणि ग्रामपंचायत मतदार संघाचा निकाल जाहीर करण्यात आला. बाजार समितीच्या सर्वच्या सर्व १८ जागांवर आमदार गटाने सरशी करत स्वाभिमानी विकास आघाडीचा धुव्वा उडवला. आमदार गटाचे सर्व उमेदवार हे ८०० ते ९०० मतांच्या फरकाने निवडून आले.

या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा दिला होता. तसेच राष्ट्रवादीनेही याच आघाडीत सहभागी होत आपले उमेदवार दिले होते. स्वाभिमानी विकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात असली तरी आमदार गटविरुद्ध खासदार गट अशीच ही लढत पहायला मिळाली. यामध्ये आ. शिवेंद्रराजे यांनी खा. उदयनराजे यांच्यावर मात केली.

हेही वाचा

Back to top button