Bhadravati APMC Election : भद्रावती कृषी ऊत्पन्न बाजार समितीत ठाकरे गटाचे वर्चस्व | पुढारी

Bhadravati APMC Election : भद्रावती कृषी ऊत्पन्न बाजार समितीत ठाकरे गटाचे वर्चस्व

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : भद्रावती कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे मतदान रविवारी (दि. ३० एप्रिल) पार पडले. यानंतर रविवारी सायंकाळीच मतमोजणी घेण्यात आली. या निकालात प्रतिस्पर्धी काँग्रेसप्रणीत शेतकरी विकास पॅनलचा पराभव करून शेतकरी सहकार शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पॅनलने एकहाती सत्ता मिळविली आहे. १८ पैकी १२ जागांवर विजय मिळवित प्रतिस्पर्धी पॅनलला सत्तेपासून दूर ठेवले आहे. प्रतिस्पर्धी पॅनलला फक्त ६ जागांवर समाधान मानावे लागले. मागील निवडणूक बिनविरोध झाली होती. परंतु यावेळी पार पडलेल्या निवडणूकीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील बारा बाजार समित्यांपैकी भद्रावतीमध्ये ठाकरे गटाने आपली एकहाती मिळविली आहे. खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या स्वत:च्या गावातच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्यातील बारापैकी नऊ बाजार समित्यांच्या निवडणूका पार पडल्या होत्या. काल रविवारी उर्वरित तीन बाजार समित्यांच्या निवडणूका झाल्या. त्यापैकी भद्रावती कृषी उत्पनन् बाजार समिती निवडणूकीमध्ये ९६ टक्के मतदार झाले. मतदानानंतर सायंकाळी मतमोजणी पार पडली. यामध्ये खासदार बाळू धानोकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांना त्यांच्या गावातच पराभव मोठा धक्का बसला. बाजार समितीच्या निवडणूकीमध्ये वज्रमूठीतील एक पक्ष असलेला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने १२ जागांवर विजय मिळवित आपली सत्ता स्थापन केली आहे. शिवसेनेचे विधानसभा अध्यक्ष रविंद्र शिंदे यांचे नेतृत्वात शेतकरी सहकार शिवसेना पॅनलने निवडणूक लढविली. तर खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर नेतृत्वात काँग्रेस प्रणीत शेतकरी विकास पॅनल मैदानात होता.

ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गटातील शेतकरी सहकार शिवसेना पॅनलचा उमेदवार व्यंकटी भुक्या हे बिनविरोध निवडून आल्यामुळे उर्वरित १७ जागांसाठी अत्यंत चुरशीची निवडणुक पार पडली. शिवसेनेचे रविंद्र शिंदे व धानोरकर दाम्पत्याकरीता ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. त्यामळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणूकीकडे लागले होते.

एकटे शिवसेनेचे रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात लढलेल्या शेतकरी सहकार शिवसेना पॅनलने 18 पैकी 12 जागांवर विजय मिळविला. तर धानोरकर यांच्या काँग्रेस प्रणीत शेतकरी विकास पॅनलने फक्त 6 जागा मिळविल्या आहेत. धानोरकरांच्या पॅनलला भाजपची साथ असल्यामुळे एकहाती सत्ता मिळेल अशी अपेक्षा होती, त्यांची जादू चालली नाही. 12 जागा शिवसेना पॅनलने खेचून घेतल्याने काँग्रेस प्रणीत पॅनलला सत्तेपासून दूर राहावे लागले आहे.

काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांना चंद्रपूर, मूल व वरोरा बाजार समितीच्या निवडणूकीमध्ये पराभव पत्कारावा लागल्यानंतर त्यांच्या स्वत:च्या गावीच भद्रावतीमध्ये वज्रमूठीतील शेतकरी सहकार शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पॅनलने सत्ता मिळविल्याने भद्रावतीमध्ये ही त्यांना सत्ता मिळविता आली नाही. मोठा धक्का बसला आहे.

Back to top button