रमजान 2023 : ईदच्या चंद्रदर्शनाची आज शक्यता | पुढारी

रमजान 2023 : ईदच्या चंद्रदर्शनाची आज शक्यता

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ईदचे चंद्रदर्शन शुक्रवारी (दि.21) होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. संध्याकाळी रोजा-इफ्तारनंतर चंद्रदर्शन घडल्यास रमजान महिना संपवून ईदची सुरुवात होईल. शहरातील मध्यवर्ती शाही मशिदीच्या चांद कमिटीतर्फे सर्वांनी चंद्र बघण्यास प्रयत्न करावे, असे आवाहन करण्यात आले असून, संध्याकाळी कमिटीच्या ईदसंबंधी घोषणेकडे सर्वांचे लक्ष केंद्रित होणार आहे. शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्यास जुने नाशिकमधील बाजारांमध्ये होणार्‍या गर्दीत अधिक भर पडण्याची शक्यता आहे. तसेच शनिवारी (दि.22) ईदचा मुख्य सोहळा शाहजहानी ईदगाह येथे पार पडेल. ईदगाह येथे सामूहिक नमाज पठणासाठी येणार्‍या हजारो मुस्लीम बांधवांसाठी मनपातर्फे पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी चंद्रदर्शन न झाल्यास रविवारी (दि.23) ईद साजरी होईल.

हेही वाचा:

Back to top button