

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राहुरी बाजार समितीची निवडणूक 28 एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान, अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले. भारतीय जनता पक्ष प्रणित विकास मंडळ व महाविकास आघाडी प्रणित जनसेवा मंडळाच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. 18 जागांसाठी भाजप व महाविकास आघाडीमध्ये सरळ लढत होणार आहे. 39 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
विविध सेवा सोसायटी सर्वसाधारण गटः 7 जागा : महाविकास आघाडी -जनसेवा मंडळ अरुण तनपुरे, महेश पानसरे, बाळासाहेब खुळे, दत्तात्रय कवाने, नारायण सोनवणे, विश्वास पवार, रखमाजी जाधव, भाजप प्रणित विकास मंडळ ःउदयसिंह पाटील, सत्यजित कदम, शामराव निमसे, संदीप आढाव, महेंद्र तांबे,भगीरथ पवार, किरण कोळसे, विविध सोसायटी महिला राखीवः 2 जागा महाविकास आघाडी ःशोभा डुकरे, सुनीता खेवरे, भाजप प्रणित विकास मंडळ आघाडीः उज्वला साबळे, उषा मांगुर्डे, विविध सेवा सोसायटी इतर मागास प्रवर्ग 1 जागेवर दत्तात्रय शेळके महाविकास आघाडी तर्फे रिंगणात असून, भाजप प्रणित विकास मंडळाचे दत्तात्रय खुळे निवडणूक रिंगणात आहेत.
विविध सेवा सोसायटी विमुक्त जाती भटक्या जमाती गटात रामदास बाचकर, जनसेवा मंडळ व आशिष बिडगर विकास मंडळ अशी लढत होणार आहे. ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण 2 जागा : मंगेश गाडे व शारदा आढाव जनसेवा मंडळ यांच्या विरोधात अमोल भनगडे व विराज धसाळ निवडणूक रिंगणात आहेत. ग्रामपंचायत मतदार संघः अनुसूचित जाती- जमाती मधुकर पवार जनसेवा मंडळ व नंदकुमार डोळस भाजपा आघाडी अशी लढत होईल. ग्रामपंचायत मतदार संघः आर्थिक दुर्बल घटक ः एक जागा, गोरक्षनाथ पवार जनसेवा मंडळ यांच्या विरोधात सुरेश बानकर अशी लढत आहे.
व्यापारी आडत मतदार संघः 2 जागा, चंद्रकांत पानसंबळ व सुरेश बाफना यांच्या विरोधात राजेंद्र वालझाडे व दीपक मेहत्रे अशी लढत होत आहे. हमाल मापाडी मतदारसंघ मारुती हारदे जनसेवा मंडळ यांच्या विरोधात शहाजी तमनर भाजपा विकास मंडळ अशी लढत होणार आहे. कृषी पतसंस्था मतदारसंघात सर्वसाधारण 14 जागांसाठी आता 16 उमेदवार रिंगणात आहेत.
39 उमेदवार निवडणूक रिंगणात
एकूण 18 जागांसाठी 39 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. छाननीनंतर 215 पैकी 176 उमेदवारांनी त्यांच्या अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात 39 उमेदवार उभे आहेत.