राहाता बाजार समिती निवडणुकीत 31 उमेदवार; पहिलीच निवडणूक

राहाता बाजार समिती निवडणुकीत 31 उमेदवार; पहिलीच निवडणूक
Published on
Updated on

शिर्डी/ एकरुखे; पुढारी वृत्तसेवा : राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीची 2023-28 च्या पंचवार्षिक निवडणुकीकरीता 127 जणांनी उमेदवारी अर्ज केले होते. यापैकी 112 अर्ज वैध ठरले तर आज (गुरुवारी) दुपारी 3 वाजेपर्यंत 78 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. या निवडणुकीसाठी 31 उमेदवार शिल्लक राहिल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सहकार संस्थेतील सर्व साधारण जागेसाठी अण्णासाहेब भाऊसाहेब कडू, विजय बाबुराव कतोरे, सार्थक सचिन कोते, बाळासाहेब किसन खर्डे, संतोष लक्ष्मण गोर्डे, जगन्नाथ दादा गोरे, दत्तात्रय विठ्ठलराव गोरे, ज्ञानेश्वर गंगाधर गोंदकर, ज्ञानदेव नारायण चौधरी, बबन लक्ष्मण नळे, उत्तमराव सावळेराम मते, बाबासाहेब पोपटराव शिरसाठ, विठ्ठल कचरू शेळके, नितीन विष्णुपंत सदाफळ हे 14 उमेदवार रिंगणात आहे.

सहकार संस्थेतून महिला प्रवर्गात अनिता शरद गोर्डे, लता वसंत चव्हाण, मीना भीमराज निर्मळ, रंजना सोन्याबापू लहारे, तर इतर मागास प्रवर्गातुन दिलीप विश्वनाथ गाडेकर, अण्णासाहेब बजाबा वाघे, भटक्या विमुक्त जाती अथवा विशेष मागास प्रवर्गातून सुनील मुरलीधर थोरात व राजेंद्र भागवत धुमसे आपले नशीब आजमावत आहेत.

या निवडणुकीसाठी शेतकरी प्रभागातील ग्रामपंचायत सर्व साधारण मतदार संघासाठी जालिंदर दगडू गाढवे, विजय बबनराव चौधरी, राहुल मच्छिन्द्र धावणे, शरद भाऊसाहेब भदे, भास्कर दामोधर मोटकर हे उमेदवार तर अनुसूचित जाती- जमातीतून सुभाष तुकाराम गायकवाड, रमेश सीताराम बनसोडे, आर्थिक दुर्बल घटकामधून शांताराम सोपानराव जपे, श्रीकांत तान्हाजी मापारी, हमाल मापडी मतदार संघातून बाबासाहेब साक्रुजी कांदळकर हे बिनविरोध निवडून आले आहेत.

राज्याचा सत्ता संघर्ष हा आता बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुढे येताना दिसत आहे. म्हणून काँग्रेसचे विधी मंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे आ. आशुतोष काळे, भाजप स्नेहलता कोल्हे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांचे पॅनल होणार आहे. त्यामुळे निवडणुकीचे रंग उधळले जाणार आहे. दरम्यान, अन्य मतदार संघात दुरंगी लढत आहे. कोल्हे गटाने अर्ज मागे घेतले आहेत.

  • व्यापारी मतदार संघातून सचिन फकिरा कानकाटे व नीलेश कानिफ बावके हे दोघे बिनविरोध झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news