श्रीरामपूर : विखे, मुरकुटे, ससाणेंविरुद्ध शेतकरी आघाडी; दिग्गज उतरले रणांगणात

श्रीरामपूर : विखे, मुरकुटे, ससाणेंविरुद्ध शेतकरी आघाडी; दिग्गज उतरले रणांगणात
Published on
Updated on

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : मोकळ्या कांदा लिलावासाठी राज्यभर नावलौलिक असलेल्या श्रीरामपूर बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. विखे, मुरकुटे, ससाणेंविरुद्ध शेतकरी विकास आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटना व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसचे आ. लहू कानडे, राष्ट्रवादीचे अविनाश आदिक, शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. अजित काळे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले व सुरेश ताके आदी नेत्यांच्या एकविचाराने शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातुन श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक लढण्याचे ठरविले आहे.

बाजार समितीच्या रणधुमाळीला आता खर्‍या अर्थाने रंगत येणार आहे. आज (गुरुवारी) माघारीच्यावेळी पालक मंत्री राधाकृष्ण विखे पा., माजी आ. भानुदास मुरकुटे व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे या तिन्ही गटांची आघाडी झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ससाणे गटास 7, विखे 6 तर मुरकुटे गटास 5 जागा देण्याचे ठरले, अशी माहिती माजी सभापती, भाजपा तालुकाध्यक्ष दीपकराव पटारे व माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी दिली. या निवडणुकीत प्रथमच विखे-मुरकुटे, ससाणे यांची युती झाली, हे विशेष! तर मावळते सभापती दीपकराव पटारे यांनी स्वखुशीने उमेदवारी नाकारली आहे.

विखे, मुरकुटे, ससाणे गटाचे उमेदवार असे; सर्वसाधारण सोसायटी मतदार संघ – किशोर शामराव बनसोडे, सोन्याबापू गोविंद शिंदे, सचिन रंगराव गुजर, नानासाहेब पुंजाजी पवार, सुधीर वेणूनाथ नवले, खंडेराव जगन्नाथ सदाफळ, गिरीधर किसनराव आसने. महिला राखीव सोसायटी मतदार संघ – सरला अण्णासाहेब बडाख, विद्या भाऊसाहेब दाभाडे.

इतर मागास प्रवर्ग – राजेंद्र अंबादास पाऊलबुद्धे. वि. जाती/भ.जमाती – दशरथ विठोबा पिसे. सर्वसाधारण ग्रामपंचायत मतदार संघ – सुनील रामभाऊ शिंदे, मयुर अशोकराव पटारे. आर्थिक दुर्बल घटक ग्रामपंचायत – अभिषेक भास्करराव खंडागळे. अनु. जाती जमाती ग्रामपंचायत- राजु काशिनाथ चक्रनारायण. व्यापारी मतदार संघ – रोहित रतिलाल कोठारी, जितेंद्र मदनलाल गदिया. हमाल-मापाडी – दीपक हिवराळे हे आहेत.

दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी समविचारी पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसचे आ. लहू कानडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. अजित काळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले व सुरेश ताके या नेत्यांनी एकविचाराने शेतकरी विकास आघाडीद्वारे बाजार समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माजी नगरसेवक अशोक कानडे, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, अ‍ॅड. अजित काळे, अनिल औताडे, ज्ञानेश्वर मुरकुटे, अरुण नाईक, कैलास बोर्डे, किशोर बकाल, सतीश बोर्डे, राजेंद्र औताडे, अ‍ॅड. मधुकर भोसले यांनी बैठक घेतली. सर्व पक्षांची प्रमुख मंडळी एकत्र येऊन पक्षाच्या माध्यमातुन भरलेल्या उमेदवारी अर्जावर विचारविनीमय करुन उमेदवार निश्चीत करण्यात आले.

ते असे; सोसायटी मतदारसंघातून सर्वसाधारण जागेवर अ‍ॅड. अजित काळे, अशोक भोसले, कैलास बोर्डे, सचिन जगताप, नामदेव आदिक, युवराज जगताप, अनिल औताडे, महिला राखीवमधून मनिषा संजय वमने, शितल संतोष कवडे, भटक्या जाती-जमाती प्रवर्गातुन साहेबराव हळनोर, इतर मागास प्रवर्गातुन किशोर बकाल, ग्रामपंचायत मतदारसंघातुन रावसाहेब (आबा) पवार, संदीप चोरगे, आर्थिक दुर्बल घटकातुन ज्ञानेश्वर वडितके, अनु. जाती जमातीमधुन प्रभाकर कांबळे, व्यापारी मतदारसंघातुन अजय डाकले, शोभा विलास शेटे तर हमाल मापाडीतून नवनाथ सलालकर आहेत.

शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातुन निवडणुक लढविण्याचा मुख्य उद्देश प्रस्थापित राजकीय मंडळींविरोधात सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या ग्रामपंचायत, सोसायटी व इतर घटकांतील काम करणार्‍या प्रामाणिक कार्यकर्त्यांना एकत्र करुन भ्रष्टाचारमुक्त व राजकीय दहशतमुक्त सर्वसामान्यांची बाजार समिती करुन, सर्वसामान्य शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका या मंडळाने घेतली.

या लढाईमध्ये प्रस्थापित व्यवस्थेला व राजकीय दडपशाहीला विरोध करुन मतदार या निवडणुकीत निश्चीतपणे शेतकरी विकास आघाडीच्या विचारधारेसोबत राहतील, अशा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर लवकरच सर्वसमावेशक बैठक घेऊन निवडणुकीची रणनिती व प्रचाराची यंत्रणा उभी करण्यात येईल, अशी माहिती काँग्रेस तालुकाध्यक्ष अरुण नाईक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष युवराज जगताप, स्वाभिमानी शेतकरीचे जितेंद्र भोसले व शिवसेना (ठाकरे गट) तालुकाप्रमुख सचिन बडधे यांनी दिली.

यावेळी विष्णुपंत खंडागळे, सुदामराव औताडे, अ‍ॅड. सर्जेराव घोडे, राजेंद्र कोकणे, सोमनाथ पाबळे, जयंत चौधरी, हरिभाऊ बनसोडे, दिलीप औताडे, संदिप गवारे, संजीव उंडे, अप्पासाहेब आदिक, अक्षय नाईक, आदित्य आदिक, संजय गवारे, सागर कुर्‍हाडे, गोविंद वाबळे, देवीदास सोनवणे, अतुल शेटे, शरद आसने, रविंद्र वाबळे, प्रमोद दांगट, सुनील थोरात, अजिंक्य उंडे, भरत जाधव, रमेश निकम,गोविंद वाघ, साहेबराव चोरमल आदी शेतकरी विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

विखे- मुरकुटे- ससाणे गट कशा रणनितीने जाणार सामोरे..?
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत व सोसायट्यांच्या निवडणुकीत मुरकुटे-ससाणे गट सरस ठरला. आ.कानडे व आदिक गटाचे प्राबल्य कमी दिसले. ही पार्श्वभूमी लक्षात घेता बाजार समितीच्या निवडणुकीत विखे- मुरकुटे- ससाणे गट कशा पद्धतीने सामोरे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्यावेळी विखे गटाचे पारडे जड..!
गेल्या पंच वार्षिक निवडणुकीमध्ये विखे- मुरकुटे- ससाणे यांची युती नव्हती, बहुमत मात्र विखे गटाच्या पारड्यात होते. दुसर्‍या स्थानावर ससाणे गट होता. मुरकुटे गटाचे रमेश सोनवणे हे संचालक होते. प्रारंभी विखे गटाचे नानासाहेब पवार व नंतर भाजपा तालुकाध्यक्ष दीपकराव पटारे यांनी सभापतीपद भूषविले.

इतरांना संधी मिळावी, म्हणून उमेदवारी नाही…!
या निवडणुकीमध्ये माजी सभापती दीपकराव पटारे यांनी इतरांना संधी मिळावी, म्हणून उमेदवारी केली नाही. याबाबत पालक मंत्री राधाकृष्ण विखे पा. व खा. डॉ. सुजय विखे पा. यांच्याशी चर्चा झाल्याने कुणीही नाराज नसल्याचे पटारे म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news