Stock Market Closing | शेअर बाजारात अस्थिरता, सेन्सेक्स १८३ अंकांनी घसरून ५९,७२७ वर बंद | पुढारी

Stock Market Closing | शेअर बाजारात अस्थिरता, सेन्सेक्स १८३ अंकांनी घसरून ५९,७२७ वर बंद

Stock Market Closing : शेअर बाजारातील आजच्या ट्रेडिंग सत्रात अस्थिरता दिसून आली. जागतिक संकेत संमिश्र असूनही मंगळवारी देशांतर्गत निर्देशांक सकारात्मक पातळीवर खुले झाले होते. पण त्यानंतर त्यात चढ-उतार दिसून आला. सकाळी १०० अंकांनी वाढून खुला झालेला सेन्सेक्स दुपारी सुमारे २९५ अंकांनी घसरून ५९,६१५ पर्यंत खाली आला. तर निफ्टी १७,७०० च्या खाली होता. त्यानंतर सेन्सेक्स १८३ अंकांच्या घसरणीसह ५९,७२७ वर बंद झाला. तर निफ्टी ४६ अंकांनी घसरून १७,६६० वर स्थिरावला. सेन्सेक्सची सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे.

आज बाजारात वरच्या स्तरावरून विक्री दिसून आली. सोमवारी मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्यानंतर मंगळवारी IT स्टॉक्सनी संमिश्र व्यवहार केला. एचसीएल टेक्नॉलॉजीसचा शेअर १.६३ टक्क्यांनी वाढला. तर इन्फोसिस आणि विप्रो किरकोळ वाढले. Sonata Software चा शेअर सुमारे २ टक्क्यांनी वधारला. टेक महिंद्रा, टाटा कन्सल्टंसी, LTIMindtree हे शेअर्स घसरले होते. रियल्टी शेअसमध्ये आज तेजी दिसून आली.

बँकिंग स्टॉक्स स्थिती काय?

बँकिंग स्टॉक्समध्ये येस बँक (६.५१ टक्के वाढ), IDFC First Bank (३.१७ टक्के वाढ), पंजाब नॅशनल बँक (०.६१ टक्के वाढ) हे शेअर्स तेजीत राहिले. तर ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक शेअर्समध्ये घसरण झाली.

टाटा मोटर्सचा शेअर ८ महिन्यांच्या उच्चांकावर

जानेवारी-मार्च तिमाहीतील चांगल्या कामगिरीच्या आशेने टाटा मोटर्सचा शेअर आज २.५ टक्क्यांनी वाढून ४८३ रुपयांवर पोहोचला. हा शेअरचा दर आठ महिन्यांतील उच्चांकी आहे. टाटा ग्रुप पॅसेंजर कार आणि युटिलिटी व्हेईकल निर्माता असलेल्या टाटा मोटर्सचा शेअर १९ ऑगस्ट २०२२ नंतर पहिल्यांदाच उच्चांकावर पोहोचला आहे. गेल्या तीन आठवड्यांमध्ये हा शेअर २० टक्क्यांनी वाढला आहे.

‘हे’ टॉप गेनर्स, ‘हे’ टॉप लूजर्स

आज सेन्सेक्सवर इंडसइंड बँक, नेस्ले, एचसीएल टेक, विप्रो, सन फार्मा, एनटीपीसी हे टॉप गेनर्स होते. तर टायटन, टेक महिंद्रा, रिलायन्स, पॉवर ग्रिड, टाटा केमिकल्स, अंबुजा सिमेंट हे शेअर्स घसरले होते. निफ्टी ५० स्टॉक्समध्ये पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट, अदानी एंटरप्रायजेस, अदानी पोर्ट्स, टायटन, रिलायन्स, बजाज फायनान्स, अपोलो हॉस्पिटल, बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प हे शेअर्स घसरले होते. (Stock Market Closing)

आशियाई बाजारात तेजी

टोकियोचे शेअर्स सलग आठव्या दिवशी उच्च पातळीवर बंद झाले. निक्केई २२५ निर्देशांक ०.५१ टक्के म्हणजेच १४४.०५ अंकांनी वाढून २८,६५८ वर बंद झाला. तर व्यापक टॉपिक्स निर्देशांक ०.६९ टक्के अथवा १३.९२ अंकांनी वाढून २,०४० वर पोहोचला.

हे ही वाचा :

Back to top button