नगर : भिंगारचे चौघे मोबाईल चोर अटकेत | पुढारी

नगर : भिंगारचे चौघे मोबाईल चोर अटकेत

नगर : पुढारी वृत्तसेवा : दुचाकीस्वारांना अडवून अडवून मोबाईल पळविणार्‍या चार आरोपींना कोतवाली पोलिसांनी 24 तासांत जेरबंद केले. मंगळवारी(दि.11) अमित तोरकडी (रा.धांदरफळ,ता.संगमनेर) हे दुचाकीवरून शिखर शिंगणापूर येथे जात असताना माळीवाडा बसस्थानकाजवळ चार जणांनी अडवून त्यांचा मोबाईल हिसकावला होता. विशाल बाबासाहेब गायकवाड, अतुल राम ननवरे, सोमेश पवन साळवे, अविनाश अशोक शेलार (सर्व रा.भिंगार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अमित तोरकडी व त्यांचे मेहुणे संगमनेर येथून शिखर शिंगणापुरला दुचाकीने जात असताना ही घटना घडली होती. भिंगार येथील चौघांनी हा गुन्हा केला असल्याची माहिती कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. गुन्हे शोध पथकाने कल्याण रस्त्यावरील एका हॉटेलच्या परिसरात सापळा लावून चारही आरोपींना अटक केली. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शितल मुगडे, मनोज महाजन, मनोज कचरे, पोलिस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, सतिष भांड, योगेश भिंगारदिवे, अब्दुल कादर इनामदार, योगेश खामकर, संदीप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे,

Back to top button