नाशिक : कापडणीस खून प्रकरणाची मेपासून नियमित सुनावणी | पुढारी

नाशिक : कापडणीस खून प्रकरणाची मेपासून नियमित सुनावणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा मुलगा डॉ. अमित कापडणीस यांच्या खून प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ॲड. उज्ज्वल निकम यांच्यासह संशयितांच्या वतीनेही दोन वकिलांनी न्यायालयात वकीलपत्र सादर केले आहे. मे महिन्यापासून दुहेरी खून खटल्याची नियमित सुनावणी सुरू होणार आहे.

संशयित राहुल जगताप व त्याच्या सहकाऱ्यांनी कापडणीस पिता-पुत्रांची निर्घृण हत्या करीत त्यांचे मृतदेह परजिल्ह्यात टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर संशयितांनी कापडणीस यांचे शेअर्स विक्री करीत व मालमत्तेचा वापर केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत सरकारवाडा पोलिसांनी या खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याची मागणी केली हाेती. त्यानुसार, फेब्रुवारी २०२३ मध्ये विधी व न्याय विभागाच्या अधिसूचनेनंतर गृहविभागाने याबाबतचे आदेश निर्गमित केले. या आदेशानुसार बुधवारी (दि.५) खटल्याच्या सुनावणीसाठी ॲड. उज्ज्वल निकम नाशिक न्यायालयात हजर झाले होते. दोन्ही बाजूच्या वकीलपत्रानंतर २१ एप्रिल रोजी नियमित सुनावणी ठेवण्यात आली आहे. तर, खटल्याप्रकरणी युक्तिवाद मे महिन्यापासून सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button