नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : स्वाती मालीवाल यांना अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभवकुमार यांनी मारहाण केल्याचे आरोप खोटे असून हा भाजपचा कट असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने एका व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे.
दिल्ली सरकारच्या मंत्री आणि आपच्या नेत्या आतिशी यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषद घेऊन हा खुलासा केला. त्या म्हणाल्या की, स्वाती मालीवाल यांनी तक्रारीमध्ये विभव कुमार यांच्यावर केलेले गंभीर आरोप निखालस खोटे आहेत. केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यावर, त्यांना घेरण्यासाठी भाजपचा हा कट आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यापासून भाजप त्यांच्यावर कोणत्या ना कोणत्या बाबतीत खोटे आरोप करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्यांनी स्वाती मालीवाल यांचा चेहरा वापरला. भाजपनेच त्यांना १३ मे रोजी मुख्यमंत्री कार्यालयात पाठवले होते, असा हल्लाबोल अतिशी यांनी केला.
त्या म्हणाल्या की, "आज एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये मालीवाल ड्रॉईंग रूममध्ये आरामात बसलेल्या दिसत आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्यांना धमकावत असून, विभव कुमारला शिवीगाळ करत आहेत. त्याच्या अंगावर कोणतीही जखम दिसत नाही. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. अरविंद केजरीवाल यांनी याबाबत काहीही प्रतिक्रिया दिली नसल्याबद्दल विचारले असता, आतिशी यांनी बोलण्याचे टाळले.
दिल्ली पोलिसांकडे त्या घटनेचे दृश्य तयार
दिल्ली पोलिसांनी स्वाती मालीवाल यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री सदनात १३ मे रोजी घडलेल्या घटनेचे दृश्य पुन्हा तयार केले. यावेळी मालीवाल यांनी १३ मे रोजीचा घटनाक्रम पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी मुख्यमंत्री सदनात तपास केला