Covid-19 updates | चिंता वाढली! देशातील कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या ५ हजारांवर, सक्रीय रुग्‍णसंख्‍या २५,५८७ वर | पुढारी

Covid-19 updates | चिंता वाढली! देशातील कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या ५ हजारांवर, सक्रीय रुग्‍णसंख्‍या २५,५८७ वर

पुढारी ऑनलाईन : देशातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५,३३५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णसंख्या २५,५८७ वर पोहोचली असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (Covid-19 updates)

काल बुधवारी देशात ४,४३५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर ११ जणांचा मृत्यू झाला होता. कोरोनाची ही रुग्णवाढ ६ महिन्यांतील सर्वांधिक आहे. आठवड्याच्या आत रुग्णसंख्या दुपटीने वाढली आहे. बुधवारी कोरोनाने महाराष्ट्रातील ४ जणांचा बळी घेतला. तर दिल्ली, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, पाँडेचेरी आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. गेल्या वर्षीच्या २४ सप्टेंबरनंतरची ही सर्वांधिक दैनंदिन रुग्णसंख्या वाढ आहे.

सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक बोलावली

आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढले नसले तरीही कोविड -१९ रुग्णसंख्येत होणारी सततची वाढ ही चिंतेची बाब आहे. देशातील अनेक भागांमध्ये कोविड-19 प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने आठवड्याच्या अखेरीस परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि आरोग्य यंत्रणा तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी आंतरराज्यीय बैठक बोलावली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मागील २४ तासांमध्‍ये देशात ५ हजार ३३५ नवे कोरोना रुग्‍ण आढळले. देशातील सक्रिय प्रकरणांची संख्या 25,587 झाली आहे. बुधवारी एका दिवसात चार हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली होती. रुग्‍णसंख्‍या वाढीचा मागील १६३ दिवसांतील हा उच्‍चांक होता.

बुधवारी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते की, मंगळवारी देशात ४,४३५ नवे कोरोना रुग्‍ण आढळले होते. १५ जणांचा मृत्‍यू झाला होता. कोरोनामुळे देशात एकूण पाच लाख 30 हजार 916 मृत्यू झाले आहेत.कोरोना रुग्‍णवाढीबाबत माहिती देशताना दि इंडियन सार्स कोव्ह २ जिनोमिक्स कन्सोर्टिम (INSACOG) अर्थात बायोटेक्नॉलॉजी विभागाने सांगितले की, कोरोना विषाणूचे नवीन स्‍वरुप देशातील ३८ टक्‍के संसर्ग प्रसारासाठी जबाबदार आहे. यासंदर्भात INSACOG ने आपाला अहवाल आरोग्य मंत्रालय आणि नीती आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीत सादर केला.

बहुतेक प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे

INSACOG च्या मते, कोरोनाचा विषाणूचा एक नवीन प्रकार हा XBB.1.16, भारताच्या विविध भागांमध्ये आढळून आला आहे, आजपर्यंत याचे ३८.२ टक्‍के संक्रमण प्रमाण होते. देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये संसर्ग वेगाने वाढला आहे, बहुतेक प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. मात्र ज्या लोकांना आधीच इतर आजार आहेत, त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे निश्चितपणे मध्यम ते गंभीर स्थितीत नोंदवली जात आहेत.

 हे ही वाचा :

Back to top button