Twitter logo changed : ट्विटरवरील’ब्लू बर्ड’ गेला, त्‍याच्‍या जागी ‘डॉगी’ आला! | पुढारी

Twitter logo changed : ट्विटरवरील'ब्लू बर्ड' गेला, त्‍याच्‍या जागी 'डॉगी' आला!

पुढारी ऑनलाईन: ट्विटरचे सीईओ एलन मस्क हे त्यांच्या आश्चर्यकारक निर्णयांमुळे नेहमीच चर्चेत असतात. मस्क यांनी आज (दि. ०४) सकाळी ट्विटरमध्ये एक मोठा बदल केला आहे. त्यांनी ट्विटरची चेहरामोहरा असलेला पूर्वीचा लोगो ब्लू बर्ड  (निळा पक्षी, Twitter logo changed) गायब करण्यात आला आहे. या निळ्या पक्ष्याची जागा आता डॉगीने (कुत्रा) घेतली आहे.

एलन मस्कने ट्विटरवरील आयकॉनिक ब्लू-बर्ड काढून, त्याजागी आता डॉगीचे छायाचित्र (Twitter logo changed) असलेला लोगो लावला आहे. ट्विटररचा डॉगी पाहून यूजर्सदेखील आश्चर्यचकित झाले आहेत. ट्विटवरील हा बदल सध्या फक्त वेब पेजवर दिसत आहे. मोबाईल ट्विटर ॲपवर अद्याप ब्लू बर्डच दिसत आहे. मस्क यांनी त्यांच्या ट्रेडमार्क शैलीत पोस्ट करून ट्विटरवरील या बदलाची माहिती दिली आहे.

यापूर्वी ट्विटर सीईओ एलन मस्क यांनी यासंबंधीचा स्क्रीनशॉटही ट्विटरवरून शेअर केला होता. यामध्ये एलन मस्क आणि निनावी खाते यांच्यातील संभाषण वैशिष्ट्यपूर्ण होते. ज्यामध्ये निळा पक्षीला डॉगीमध्ये बदलण्यास सांगितले होते. ट्विटरवर ही पोस्ट शेअर करताना मस्क यांनी As promised (‘आश्वासन दिल्याप्रमाणे’) (Twitter logo changed) असे कॅप्शन देखील दिले आहे.

Twitter logo changed: ‘डॉगी’ लोगोचा अर्थ ?

ट्विटरने त्यांच्या प्रोफाईलवरून ब्लू बर्डची इमेज काढून डॉगीची ईमेज लोगो म्हणून जारी केली आहे. हा लोगो म्हणजे शिबू इनूचा छायाचित्र आहे. शिबा इनू ही जपानमधील शिकारी कुत्र्यांची एक जात आहे. डॉजकॉइन ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सीचे प्रतीक म्‍हणून  देखील वापरण्‍यात आले होते. २०१३ मध्ये विनोदाचा भाग म्हणून तसेच दुसऱ्या क्रिप्टोकरन्सीला स्पर्धा म्हणून हे चिन्ह आणि नावाची क्रिप्टोकरन्सी लॉन्च करण्यात आली होती.

हेही वाचा:

Back to top button