jayakwadi dam : जायकवाडी धरणातून सलग दहाव्या दिवशी विसर्ग सुरूच | पुढारी

jayakwadi dam : जायकवाडी धरणातून सलग दहाव्या दिवशी विसर्ग सुरूच

पैठण; पुढारी वृत्तसेवा

पैठण येथील जायकवाडी धरणातून (jayakwadi dam) सलग दहाव्या दिवशी गोदावरी नदीमध्ये शनिवार रोजी सकाळी ३७ हजार ७२८ क्युसेक विसर्ग सुरू आहे. छोट्यामोठ्या धरणातून २६ हजार ७६५ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.

जायकवाडी धरणाच्या (jayakwadi dam) पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे वरील धरणाची पाणी पातळी पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या धरणामध्ये पाण्याचा विसर्ग येण्यास सुरुवात झाली. २९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पैठण येथील गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू केला होता.

सलग दहा दिवसाच्या काळात अधून मधून पाण्याची आवक कमी अधिक मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे धरणाचे आपत्कालीन दरवाजे काही काळ उघडण्यात आले. एक लाखपर्यंत पाण्याचा विसर्ग गोदावरी सोडण्यात आला होता. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत होती. सध्या या धरणात एकूण पाणीसाठा २८७०. ८३० टक्केवारी ९८ .२३ ठेवण्यात आली आहे.

मागील वर्षी याच दिवशी उपयुक्त पाणीसाठा २१७०. ९३५ दलघमी नोंद होती. त्यामुळे यावर्षी देखील दहाव्या दिवशी शनिवार रोजी सकाळी धरणातून ३७ हजार ७६२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याची आवक त्याच पद्धतीने विसर्ग करण्याचे नियोजन येथील पाटबंधारे विभागाच्या कर्मचार्‍यांकडून करण्यात येत असल्याची माहिती धरण सहाय्यक गणेश खराडकर यांनी दिली आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button