मित्रानेच केला घात; १७ वर्षीय मुलीवर सात जणांनी केला बलात्कार | पुढारी

मित्रानेच केला घात; १७ वर्षीय मुलीवर सात जणांनी केला बलात्कार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा

सामूहिक बलात्काराच्या घटनेने शुक्रवारी नागपूर हादरले. नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली, तर तीन संशयित आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एेरणीवर आला आहे.

एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील इससानी मिहान मार्गावर अल्पवयीन मुलगी मित्रासोबत फिरायला गेली होती. तिथे अचानक पोहोचलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी मित्राला मारहाण केली. त्यानंतर पीडितेवर सामूहिक बलात्कार केला, अशी तक्रार पोलिसांकडे आली होती.

या प्रकरणाचा तपास करत असताना मुलीच्या मित्रानेच पैसे घेऊन मुलांना बोलावल्याचे उघडकीस आले. तीन दिवसांपासून हा प्रकार सुरू असताना काल ही घटना घडली. यात सामूहिक बलात्कार प्रकरणात एकूण सात आरोपी असून, यात मुलीच्या मित्रासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. तिघांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय चाचणी केली असून, तिची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले.

नागपूरचे अतिरिक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी या प्रकरणाबद्दल अधिकची माहिती दिली. अल्पवयीन मुलगी मित्रासोबत फिरायला गेली होती. मात्र मित्राने काही तरुणांकडून पैसे घेऊन त्यांना त्या ठिकाणी बोलावून घेतल्याचे पोलिस तपासात पुढे आलं आहे. घटनेचा पेच वाढला असून, या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माईंड मुलीचा मित्र असल्याचं पुढे येत आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button