संगमनेर : शेतकर्‍यांनी ऊस उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा : आ. थोरात | पुढारी

संगमनेर : शेतकर्‍यांनी ऊस उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा : आ. थोरात

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी ‘आहे ती जमीन, आहे ते पाणी आणि एकरी टनेज’ या त्रिसूत्रीचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेत दर हेक्टरी उसाची उत्पादकता वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन काँग्रेस विधीमंडळ पक्षनेतेवमाजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 20 22- 23 या वर्षीच्या ऊसगळीत हंगामाची सांगता माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात व त्यांच्या सुविद्य पत्नी कांचन थोरात यांच्या हस्ते गव्हाणीमध्ये उसाची मोळी टाकून झाली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहोळ होते.

तर व्यासपीठावरती माजी आ. डॉ. सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, संगमनेर दूध संघाचे चेअरमन, रणजीत देशमुख, अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधीर जोशी, बाजीराव खेमनर, लहानुभाऊ गुंजाळ, रामनाथ राहणे, साखर कारखान्याचे, व्हा. चेअरमन संतोष हासे, संचालक इंद्रजीत थोरात, गणपत सांगळे, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने मागील वर्षी 15 लाख मेट्रिक टन उसाचे गळीत केले होते. मात्र यावर्षी 10 लाख मेट्रिक टन उसाचे गळीत होईल की नाही? याची शास्वती नव्हती तरी सुद्धा सर्वांच्या सहकार्याने 10 लाख मेट्रिक टनाच्या पुढे या साखर कारखान्याने गळीत केले आहे. हे खरे असले तरी यावर्षी कारखान्याची रिकव्हरी 12.03 पर्यंत गेली आहे. त्यामुळे ऊस उत्पादकाला भाव वाढवून घ्यावा लागेल, हे ही मात्र तितकेच खरे आहे. इतर साखर कारखाने आपली कार्यक्षमता वाढवित आहे. त्यामुळे साखर कारखान्याची कार्य क्षमता वाढविण्यासाठी तसेच स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी प्रत्येक ऊस उत्पादकाला आपला स्वतःचा ऊस उभा करणे अपेक्षित आहे.

संगमनेरच्या सहकारी संस्था, शिक्षण संस्था व्यापार, शेती चांगले असून या चांगल्या कामाचा अभिमान बाळगताना आपण सर्वांनी चांगल्या कामाच्या पाठीशी भक्क मपणे उभे राहावे, असे आवाहन आ. थोरात यांनी केले. माजी आ. डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे गर जेचे आहे. तसेच शेतीत नवनवीन तंत्रज्ञान वाटून उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

आ सत्यजित तांबे म्हणाले की, साखर कारखान्याने साखरेबरोबरच उपपदार्थ निर्मितीबरोबर आगामी काळात इथेनॉल निर्मितीमध्ये मोठी संधी असून कारखा न्यांच्या प्रशासनाने जास्तीतजास्तइथेनॉल निर्मितीवर भर द्यावा. अध्यक्षीय भाषणात कारखान्याचे चेअरमन प्रतापराव म्हणाले की, साखर कारखान्याने सर्वांच्या प्रयत्नामुळे 12.3 चा साखर उतारा मिळविला आहे. संगमनेर तालुका हा विकासात पुढे असून काही विघ्न संतोषी लोक यात अडथळे निर्माण करू पाहत आहे. त्यांना जनताच उत्तर देईल, असे त्यांनी ठणकावून सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर व्हा. चेअरमन संतोष हासे यांनी आभार मानले.

निळवंडेचे कालवे कोणीही अडवू शकत नाही
निळवंडेच्या कालव्यांना आपल्याला दिवाळी पाडव्यापर्यंतच पाणी
आणायचे होते. परंतु सरकार बदलले, त्यामुळे थोडा विलंब झाला आता तर जलपूजनाला कोणीतरी पाहुणा आणायचा आहे, म्हणून ते रखडले आहे. मात्र आता काहीही झाले तरी निळवंडेचे पाणी कुणीही अडवू शक णार नाही, अशी कोपरखळी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता मारली.

कामगारांना वेतन फरकपोटी 4 कोटी 21 लाख
थोरात कारखान्याने सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक, यांच्याबरोबर कामगारांचे हित जोपासताना अनेक दूरदृष्टीचे निर्णय घेतले असून वेतन फरक 4 कोटी 21 लाख रुपये देण्याचा निर्णय आमदार बाळासाहेब थोरात यांनी जाहीर करतात. सर्व कामगारांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

Back to top button