नाशिक : श्रीराम नवमीनिमित्त ऑनलाइन स्तोत्र पठण वर्ग | पुढारी

नाशिक : श्रीराम नवमीनिमित्त ऑनलाइन स्तोत्र पठण वर्ग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक व प्रभू श्रीराम यांचे अतूट असे नाते आहे. त्यामुळे या शहरामध्ये श्रीराम नवमीनिमित्त ठिकठिकाणी रामजन्मोत्सव सोहळा पार पडतो. भावी पिढीलाही भारतीय संस्कृतीचे ज्ञान व्हावे, त्यांना परिपूर्ण माहिती मिळावी. या पार्श्वभूमीवर या श्री क्षेत्र नाशिकमध्ये बालकांसाठी रामकथा नाटक ऑनलाइन विनामूल्य सामूहिक श्रीरामरक्षा स्तोत्र व मारुती स्तोत्र पठण करण्यात येत आहे.

हल्ली सगळ्याच मुलांचे इंग्रजी शाळेतील प्रवेश असल्याने त्यांची मराठी भाषेकडे पाठ वळते. गीता शिकविण्याच्या प्रयोजनामुळे मराठी विषय अवघड वाटू लागणारी ही मुले श्लोक पठणाच्या सरावामुळे अस्सखलित संस्कृत श्लोक आत्मसात करत आहेत. त्यांच्यासाठी नाशिक येथील मोहिनी लावर यांच्या पुढाकाराने नुकताच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ५ ते १५ या बालवयोगटासाठी विनामूल्य ऑनलाइन श्लोक पठण केले जात आहे. यामध्ये कोल्हापूर, सातारा, खिंदवाडी, कराड, दापोली यासह नाशिकच्या बालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. ही बालके नित्यनियमाने न चुकता श्लोक पठण करत आहेत. दररोज संध्याकाळी ७ च्या ठोक्याला ऑनलाइनवर मोहिनी लावर या मुलांकडून एक श्लोक किमान पाच वेळा वदवून घेतात. त्यामुळे मुलांचे संस्कृत श्लोकाचे उच्चार स्पष्ट झाले आहेत. शिवाय मराठी भाषाही त्यांना सोपी वाटू लागली आहे. या समूहामध्ये एकूण 29 मुलांचा सहभाग असून नाशिकमधून 6, तर भगूर येथून एक इतकी मुले या वर्गातून श्लोक पठण करत आहेत. त्यांनी रामनवमीच्या पार्श्वभूमीवर एक छोटी नाटिकादेखील तयार केली आहे. त्यानुसार पात्राच्या वेशभूषेप्रमाणे ही बालके रामनवमीला नाटक सादर करणार आहेत.

हेही वाचा:

Back to top button