काळाराम मंदिर परिसरातील रस्ते रामनवमीला वाहतुकीसाठी बंद | पुढारी

काळाराम मंदिर परिसरातील रस्ते रामनवमीला वाहतुकीसाठी बंद

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

रामनवमीच्या निमित्ताने श्रीराम जन्मोत्सव साजरा होत असल्याने काळाराम मंदिर परिसरातील रस्ते ३० मार्चला सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाच्या पोलिस उपआयुक्तांकडून कळविण्यात आले आहे. रामनवमीला काळाराम मंदिर संस्थानच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव सोहळा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनिमित्त या परिसरात भाविकांची गर्दी उसळते. काळाराम मंदिर व सरदार चौक ते श्रीराम मंदिर पूर्व दरवाजा येथील रस्ते अतिशय अरुंद असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी वाहतूक नियंत्रण अधिसूचना काढली असून, ३० मार्चला सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत सरदार चौक ते काळाराम मंदिर पूर्व दरवाजा हा मार्ग दोन्ही बाजूने येण्या-जाण्यासाठी बैलगाडया व सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद राहणार आहे. परंतु हे निर्बंध पोलिस वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन बंब यांना लागू राहणार नाही.

हेही वाचा:

Back to top button