Fansache sweet vade : १५ मिनिटांत बनवा फणसाचे खुसखुशीत गोड वडे | पुढारी

Fansache sweet vade : १५ मिनिटांत बनवा फणसाचे खुसखुशीत गोड वडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : कडक उन्हाळ्यासोबत मुलांच्या सुट्टीचे दिवस सुरू झाले आहेत. एकीकडे परीक्षा संपल्याने मुलांकडे खूप सारा वेळ आहे. तर दुसरीकडे सुट्टीत वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याचा बेत आखला जात आहे. सुट्टीच्या काळात मुलांना चांगले चटपटीत खाऊ हवे असते. मार्च, एप्रिल, मे या महिन्यांमध्ये आंबे, काजू, जांभूळ, फणस सहज उपलब्ध होतात. फणस कुणाला नाही आवडणार? तुम्ही फणसापासून विविध पदार्थ बनवून लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना खाऊ घालू शकता. यावेळी फणसापासून एक छान पदार्थ बनवा. फणसाचे खुसखुशीत आणि गोड वडे कसे बनवायचे ते जाणून घ्या. ( Fansache sweet vade )

साहित्य –

पिकलेल्या फणसाचे गरे- एक वाटी
गव्हाचे किंवा तांदळाचे पीठ- एक वाटी
बारिक चिरलेला गुळ किंवा साखर- ४ चमचे
मीठ- चवीनुसार
वेलदोडे आणि जायफळ पावडर – एक चमचा
तळण्यासाठी तेल

कोकणातील फणसाचे वडे//फणसाचे घारगे//Jackfruit Poori Recipe// sanvee Recipe Marathi...... - YouTube

कृती –

 

१. पहिल्यांदा पिकलेल्या फणसाचे गरे घेऊन त्यातील बिया बाजूला काढून टाकाव्यात.

२. मिक्सरच्या भांड्यात ते गरे घालून त्याची पेस्ट बनवावी. (टिप- यावेळी मिक्सरमध्ये पाणी अजिबात घालू नये.)

३. यानंतर मिस्करमधील पेस्ट एका पसरट भांड्यात घेवून त्यात एक चमचा तेल, चवीनुसार मीठ, वेलदोडे- जायफळ पावडर आणि गुळ- साखर घालावी. (टिप- गुळ घालताना बारिक किसणीने किसून घालावा.)

४. या मिश्रणात नंतर गव्हाचे किंवा तांदळाचे पीठ घालून ते हाताने मळावे. (टिप- मळताना पीठाचा घट्ट गोळा तयार होवूपर्यत जास्तीचे पीठ घातले तरी चालते.)

५. तयार झालेल्या घट्ट पीठाच्या गोळ्याला पुन्हा थोड तेल लावून मऊ होईपर्यंत मळावे.

६. वडे करण्यासाठी पिठाचे लहान- लहान गोळे तयार करावे.

७. पोळपाटावर गोळे ठेवून ते लाटण्याच्या सहाय्याने तेल लावून पुरीसारखे लाटावे. (टिप- हाताला तेल लावूनही या गोल वडे किंवा पुऱ्या बनविल्या तरी चालतात.)

८. यानंतर कढईत वडे तळण्यासाठी तेल गरम करून त्यात तयार केलेले एक-एक वडे सोडावेत.

९. तेलात केसरी रंग येईपर्यंत वडे तळावेत.

१०. यानंतर खुसखूशीत पिकलेल्या फणसाचे वडे तयार होईल.

११. तयार वडे सकाळच्या नाष्ताला किंवा चहासोबत खायला घ्या. ( Fansache sweet vade )

फणसाचे वडे / घारगे l Fansache Vade l Jackfruit Puri l कोकणातील फणसाचे वडे l जय मल्हार रेसिपीज l - YouTube

हेही वाचा : 

Back to top button