परभणी: कोल्हेवाडी येथे पीककर्जाच्या विवंचनेतून शेतकऱ्याने जीवन संपविले

परभणी: कोल्हेवाडी येथे पीककर्जाच्या विवंचनेतून शेतकऱ्याने जीवन संपविले

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील कोल्हेवाडी येथील एका ५४ वर्षीय शेतक-याने पीककर्जाची नापिकीमुळे परतफेड करता येत नसल्याने विष प्राशन केले होते. त्यांना नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. Parbhani

याबाबत अधिक माहिती असी की, पूर्णा तालुक्यातील गोदाकाठी असलेल्या कोल्हेवाडी गावातील शेतकरी गंगाधर माणिकराव पवार यांनी आपल्या कानडखेड येथील ५ एकर जमिनीवर काही महिन्यांपूर्वी भारतीय स्टेट बँकेकडून पीककर्ज घेतले होते. परंतु, ओला व कोरड्या दुष्काळामुळे कर्जाची परतफेड करता येत नव्हती. त्यामुळे या विवंचनेतून त्यांनी शेतात विषारी औषध प्राशन केले. ही बाब उघडकीस आल्यावर त्यांना उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली.
या घटनेची माहिती मुलगा कृष्णा पवार यांनी पूर्णा ठाण्यात दिली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news