पुढारी ऑनलाईन डेस्क : हिमोग्लोबीन कमी होणे म्हणजे, शरीरातील रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होणे. पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील हिमोग्लोबीनचे प्रमाण आहार आणि वयानुसार बदलत असते. हिमोग्लोबीनचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी झाल्यास शरीरातील लाल रक्ताच्या पेशी कमी होतात. ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन अनेक आजार उद्भवतात. हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी हे पदार्थ खाऊ शकता. (Hemoglobin)
दोन चमचे तीळ दोन तास पाण्यात भिजवून पाणी गाळून त्याच्या पेस्टमध्ये एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा खाल्यास हिमोग्लोबीन वाढण्यास याचा नक्की फायदा होतो.
डाळिंबमध्ये लोहसोबत कॅल्शिअम, प्रोटीन्स, फायबर आणि इतर अनेक घटक असतात. त्यामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते. अशक्तपणा आल्यास डाळिंबमुळे शरीरातील झीज लवकर भरून निघते. याशिवाय त्वचेसाठीही उपयुक्त ठरते.
दररोज रात्री दोन चमचे हळद कोमट पाण्यात टाकून प्यायल्याने रक्ताचे प्रमाण वाढते.
जांभूळ रस आणि आवळा रस समप्रमाणात घेऊन पिल्याने शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते.
हिरव्या पालेभाज्यामध्ये लोहाचे प्रमाण सर्वात जास्त असते. नियमीत हिरव्या पालेभाज्याचे सेवन केल्यास शरीरातील लोहासोबत हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते.
टोमॅटो हे लोहाचा उत्तम स्त्रोत आहे. टोमॅटोमध्ये लोह आणि जीवनसत्व 'क' मिळते. यामुळे हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. दररोजच्या जेवणात एक तरी टोमॅटोचा नक्की वापर करा.
निरोगी जीनवशैलीसाठी दररोज मुठभर सुकामेवा खावा असे सांगितले जाते. अंजीर, जर्दाळू, खारीक, बदाम, काळे मनूके दररोज मुठभर खाल्याने शरीराला आवश्यक लोहासोबत हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते.
मध शरीरासाठी उत्तम आणि अत्यंत चांगले मानले जाते. दररोज दोन चमचे मध कोमट पाण्यातून घेतल्यास शरीराला चांगले फायदा होतो. कारण, मधामध्ये अनेक पोषक घटक असतात. मधामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून दिवसभर काम करण्याची उर्जा निर्माण होते.
उपवासाच्या दिवशी अशक्तपणा कमी करण्यासाठी खजूर आवर्जून खाल्ले जाते. यासाठी खजूराला सुपरफूड असेही म्हटलं जातं. खजुरात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
बीटामध्ये लोह आणि जीवनसत्त 'क' हे घटक असल्याने हिमोग्लोबीन वाढण्यासाठी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तर बिटरूटचा त्वचेवरही चांगला परिणाम होवून त्वचा उजळण्यास मदत होते.
शेंगदाणे आणि गुळामध्ये सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. तसचे प्रत्येकाच्या घरात शेंगदाणे आणि गुळ सहज उपलब्ध होत असतो. यामुळे दोन्ही गोष्टीचा हिमोग्लोबीन वाढण्यास उपयोग होतो. ( Hemoglobin )
हेही वाचा :