Sweet Corn Recipe : कुरकुरीत स्वीट कॉर्न आवडतंय ना? चला मग बनवूयात… | पुढारी

Sweet Corn Recipe : कुरकुरीत स्वीट कॉर्न आवडतंय ना? चला मग बनवूयात...

पुढारी ऑनलाईन डेस्क : ग्रामीण भागात अगदी सोप्या पद्धतीने मक्याचे कणीस उपलब्ध होत असते. शहरात स्वीट कॉर्न मार्केटमध्ये मिळत असते. परंतु, आपण एक तर मक्याचे कणीस भाजून आणि उकडून खातो. फार तर मक्याच्या दाण्यापासून चिवडा तयार करतो. यापलीकडे फारसे पदार्थ तयार करायला आपण धजत नाही. स्वीट कॉर्न आणून नाष्ता किंवा संध्याकाळी टाईमपास म्हणून बनविले जाते. तुम्हाला माहिती आहे का, मक्यापासून खूप सुंदर पदार्थ बनवता येतात. त्यापैकी एक पदार्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा पदार्थ गोड असून तुमच्या मुलांनादेखील नक्कीच आवडेल. ( Sweet Corn Recipe )

मक्याच्या कणीसमध्ये खनिजे, अँटिऑक्सिडेंट्स आणि जीवनसत्त्वे अ, बी, ई सारखे अनेक पोषक घटक असतात. लहान मुलांना तर खूपच स्वीट कॉर्न आवडते. स्वीट कॉर्न घरच्याघरी आणि कमी साहित्यात बनवता येतो. यामुळे चला जाणून घेवूयात कुरकुरकीत स्वीट कॉर्न रेसीपी कशी बनवायची? ( Sweet Corn Recipe )

Crispy Corn Recipe: How to make Crispy Corn Recipe at Home | Homemade Crispy Corn Recipe - Times Food

स्वीट कॉर्न बनविण्याचे साहित्य

मक्याचे कणीस – दोन किंवा स्वीट कॉर्न २ वाटी
गव्हाचे पीठ- ३ चमचे
कॉर्न फ्लोअर- ३ चमचे
बटर, तेल- तळण्यासाठी
धने पावडर- १ चमचा
बारिक चिरलेली हिरवी मिरची- १ चमचा
कडीपत्ता- ७-८ पाने
लिंबूचा रस- १ चमचा
चिली फ्लेक्स – १ चमचा
मीठ- चवीनुसार
कांदा- १
कोथबिंर- २ चमचे
टॉमेटो सॉस- २ चमचे
आलं- लसून पेस्ट- १ चमचा

कृती –

१. पहिल्यांदा दोन मोठे कणीस घेऊन त्याचे दाणे काढून घ्या.

२. काढलेले दाणे किंवा स्वीट कॉर्न स्वच्छ पाण्याने धुवून एका मोठ्या भांड्यात उकडण्यास घाला.

३. त्या भांड्यात स्वीट कॉर्न आतमध्ये भिजतील एवढे पाणी घालून भांडे गॅसवर ठेवा. या पाण्यात एक चमचा मीठ घाला.

४. १० ते १५ मिनिटांनी स्वीट कॉर्न उकडल्यानंतर त्यातील पाणी काढून टाका.

५. गरम स्वीट कॉर्न एक भांड्यात काढून त्यात पहिल्यांदा एक चमचा गव्हाचे पीठ आणि एक चमचा कॉर्न फ्लॉअर घालून ते मिश्रण चमच्याने एकत्रित करा.

६. हे मिश्रण परत एक चमचा गव्हाचे पीठ आणि एक चमचा कॉर्न फ्लॉअर घालून मिसळा. यानंतर शेवटी सगळे पीठ आणि कॉर्न फ्लॉअर घालून चांगले मिसळा. (टिप- स्वीट कॉर्नला चांगले पीठ लागेपर्यत हे मिश्रण मिसळावे. याच दरम्यान थोड्या पाण्याचा शितोंडे दिले तरी चालते. पूर्ण कॉर्न पीठात मिसळले जात नाही तोपर्यंत हे कॉर्न मिसळत रहावे.)

७. यानंतर कॉर्नच्या प्लेटमध्ये तळाला राहिलेले पीठ बाजूला करून वरचे-वरचे कॉर्न गॅसवरील मध्यम आचेवरील तेलात ५ ते ६ मिनिटे तळून द्यावे.

८. यानंतर दुसऱ्या एका कढाईतील तेलात आलं- लसून पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, टोमॅटो सॉस, चिली फ्लेक्स, धने पावडर, कडिपत्ता टाकून चांगले परतवून द्या.

९. यानंतर यात स्वीट तळलेले कॉर्न घाला आणि ते परतून घ्या.

१०. शेवटी तयार स्वीट कॉर्न एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घाला.

११. कुरकुरीत आणि स्वीट कॉर्न सकाळच्या नाष्त्याला तयार आहे.

हेही वाचा : 

Back to top button