पुढारी ऑनलाईन डेस्क : कडाक्याच्या थंडीनंतर सर्वत्र आता कडक उन्हाळा सुरू होत आहे. उन्हाळा म्हटलं की, कडक ऊन आणि त्याचे चटके सहन करता-करता आपल्याला अगदी कधी संपेल हा उन्हाळा असं वाटू लागतं. कामाची घाईगडबड आणि त्यात उन्हाच्या झळा…बाप रे! नकोच!. कडक उन्हाळ्यात आणखी एक समस्या उद्भवते ती म्हणजे, दुधाची. दूध नासण्याचे प्रकार या काळात खूप होतात. यानंतर या नासलेल्या दुधाचे करायचे काय हा प्रश्न पडतो. यावर उपाय म्हणून काही खास आणि टेस्टी पदार्थ तयार करून या दुधाचा उपयोग करता येऊ शकतो. (Testy Sweets from Spoiled Milk)
उन्हाळ्यात दूध गरम करताना ते नासले जाते किंवा अचानकपणे ते नासलेले दिसते. यानंतर आपण दूध खराब झाले म्हणून फेकून देतो. आता असे न करता नासलेल्या दुधापासून असे अनेक पदार्थ तयार करता येतात त्याची माहिती घेऊयात.
नासलेलं दूध- अर्धा लिटर
साखर – पाव कप
वेलची पावडर- चवीप्रमाणे
१. पहिल्यांदा नासलेले अर्धा लिटर दूध गॅसवर ठेवून त्यातील सगळे पाणी आटेपर्यंत हलवत रहावे, जवळपास अर्धा तास हे मिश्रण हलवणे.
२. यानंतर त्यात पाव कप साखर घालणे आणि हे मिश्रण देखील हलवणे.
३. गॅसवरील मिश्रणात साखर घातल्याने त्याला पाणी सुटते. ते मिश्रण घट्ट होईपर्यत हलवत रहावे.
४. यानंतर पाणी कमी झाल्यावर यात वेलची पावडर घालावी.
५. एका वाटीला तेल लावावे आणि हे मिश्रण त्यात काढून घ्यावे.
६. यानंतर थंड होण्यास फ्रीजमध्ये किंवा बाजूला काढून ठेवावे.
७. थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये हा मिल्ककेक ठेवावा. तुम्ही ड्रायफ्रूट्स घालूनही केक सजवू शकता.
नासलेलं दूध- दोन वाटी
वेलची पूड- एक चमचा
गुळ – गोडीनुसार
१. पहिल्यांदा नासलेल्या दुधात वरती साचलेलं पाणी काढून टाका.
२. यानंतर त्यात गुळ घालून गॅसवर ठेवावे.
३. या मिश्रणातील थोडं- थोडं पाणी आटल्यानंतर त्यात वेलदोडेची पूड टाकावी आणि मिश्रण हलवत रहावे.
४. यानंतर शेवटी बर्फीसारखा असणारा गोड पदार्थ आणि चवीला छान लागणारा पदार्थ खावा.
पनीर बनवा
नासलेलं दूध- १ लिटर
लिंबू- १
१. नासलेले १ लिटर दूध पहिल्यांदा गॅसवर ठेवून त्यात लिंबाचा रस घालावा.
२. यानंतर हे मिश्रण चमच्याने हलवावे.
३. थोड्या वेळाने मिश्रण थंड झाल्यावर गॅसवरील भाडे खाली उतरावे.
४. यानंतर एक सुती कापड घेवून त्यात हे मिश्रण घालून त्यातील संपूर्ण पाणी काढून टाकावेत. (टिप- पाणी काढताना एखादी वजनदार वस्तू कापडावर ठेवली तरी चालेल)
५. यानंतर याचे तुमच्या आवडीप्रमाणे छोटे- छोटे काप तयार करावेत.
६. यानंतर सुंदर, मस्त आणि लुसलुशीत पनीर तयार होईल.
नासलेले दूध- एक लिटर
वेलची पूड- एक चमचा
जायफळ- १ चमचा
गुळ किंवा साखर – गोडीनुसार
खवा
१. नासलेल्या दूधातील पहिल्यांदा पाणी काढून टाका.
२. यानंतर दूधाचे भांडे गॅसवर ठेवून त्यातील पाणी हळू- हळू आटवावे.
३. यात बारीक केलेले वेलची पूड आणि जायफळ मिसळून हे मिश्रण सारखे- सारखे हलवत रहा. (टिप- खाली भांडे करपणार नाही याची काळजी घ्यावी)
४. यानंतर गॅसवरील मिश्रणात तुमच्या आवडीप्रमाणे गूळ किंवा साखर आणि खवा घालून पुन्हा-पुन्हा हे हालवत रहावे.
५, शेवटी यातील पाणी संपल्यानंतर किंवा लाल रंग आल्यानंतर हे गॅसवरून भाडे खाली उतरावे.
६. यानंतर हे मिश्रण एका सपाट भांड्याला तेल लावून त्यात पसरावे आणि थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे.
७, थंड झालेल्या मिश्रणाचे आवडीप्रमाणे छोटे- छोटे काप तयार करावे. आणि तयार झाली खुसखुशीत आणि स्वीट खवा बर्फी. (Testy Sweets from Spoiled Milk).
हेही वाचा :