गड चढायला मावळ्याचं काळीज लागतं; अमोल मिटकरींची राज ठाकरेंवर टीका | पुढारी

गड चढायला मावळ्याचं काळीज लागतं; अमोल मिटकरींची राज ठाकरेंवर टीका

अकोलाः पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावर केलेल्या भाषणानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ‘गड चढायला मावळ्याचं काळीज असावं लागतं. कावळ्याची टिवटिव नव्हे.’ असा टोला लगावला आहे. ट्विटरच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्यांवर अमोल मिटकरींनी खोचक टिका केली आहे.

राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी राज्यातील मशीदींवरील अनाधिकृत भोंग्यांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला येत्या ६ जूनला ३५० वर्षे होत असून कार्यकर्त्यांना रायगडावर येण्याचे आवाहन केले. हा मुद्दा पकडून आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर टीका केली.

राज ठाकरे ६ जूनला रायगडावर जाणार आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काही देण-घेणे नसलेले हास्यसम्राट ६ जुनला रायगड जाणार हा प्रकार हास्यास्पद आहे. कारण ‘गड चढायला मावळ्याचं काळीज असावं लागतं. कावळ्याची टिवटिव नव्हे.’ असा खोचक टोला अमोल मिटकरींनी लगावला आहे.

हेही वाचा : 

Back to top button