वर्कप्लेसवरील सकारात्मकता कर्मचाऱ्यांतील नैराश्य घालवते; हॉर्वर्ड विद्यापीठाचे संशोधन | पुढारी

वर्कप्लेसवरील सकारात्मकता कर्मचाऱ्यांतील नैराश्य घालवते; हॉर्वर्ड विद्यापीठाचे संशोधन

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था : नोकरीच्या ठिकाणचे वातावरण आणि कर्मचाऱ्यांचे वर्तन या मुद्दयावर हार्वर्ड विद्यापीठात ८५ वर्षांपासून संशोधन सुरू आहे. वर्कप्लेसवरील सकारात्मता आणि पोषक नाते कर्मचाऱ्यांना आनंदी ठेवते, त्याचा एकूणच व्यवसायवृद्धीला उपयुक्त फायदा होतो, असे दिसून आले.

एकंदरीत हॅप्पीनेस आणि वर्कप्लेस यावर दीर्घ संशोधनाचा हा पहिलाच प्रयोग ठरावा, अशी माहिती हॉर्वर्ड मेडिकल स्कूलमधील मानसशास्त्राचे प्राध्यापक आणि हॉर्वर्ड स्टडी ऑफ अॅडल्ट डेव्हलपमेंटचे संचालक रॉबर्ट वाल्डिंगर यांनी दिली. १९३८ पासून हार्वर्ड विद्यापीठाने जगभरातून ७०० लोकांच्या आरोग्याच्या नोंदी घेण्यास सुरुवात केली. जिथे कर्मचाऱ्यांना वेगळे बसून काम करावे लागते, त्यांच्यात एकाकीपणाची समस्या आढळली. डिलिव्हरी पार्टनर, ट्रक ड्रायव्हर, नाईट शिफ्ट करणारे कर्मचारी, स्थलांतरित कामगारांसारखे काम करणारे लोक नाखूश असतात. अशा पद्धतीच्या गोष्टी नकारात्मक वातावरण तयार करतात. तुम्ही लोकांशी जास्त जोडलेले असाल तर नोकरीबाबत जास्त समाधान वाटते.

Back to top button