रामपूरी चाकूची तब्बल 20 फूट भव्‍य प्रतिकृती साकारली ! | पुढारी

रामपूरी चाकूची तब्बल 20 फूट भव्‍य प्रतिकृती साकारली !

लखनौ : उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्हा येथे तयार होणार्‍या चाकूंसाठीही प्रसिद्ध आहे. हे रामपुरी चाकू सत्तरच्या दशकातील बॉलीवूडच्या काही ब्लॉकबस्टर चित्रपटांमुळे प्रसिद्ध झाले होते. आता चाकूसाठी प्रसिद्ध असलेल्या रामपूरमध्ये या चाकूची भव्य प्रतिकृती एका चौकात ठेवण्यात आली. ही प्रतिकृती तब्बल 20 फुटांची आहे.

सुमारे तीन दशकांपूर्वीपर्यंत रामपुरी चाकू हा जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा होता. तिथे चाकू बनवणारे कारखाने गल्लोगल्ली होते. हळूहळू या चाकूचे अस्तित्व कमी होऊ लागले आणि कारागिर अन्य व्यवसायांकडे वळले. रामपूर प्रशासनाने आता 52.52 लाख रुपये खर्च करून वीस फूट लांबीचा चाकू बनवला आहे. जिल्ह्याची ओळख अबाधित राहावी यासाठी हा चाकू एका चौकात बसवण्यात आला आहे.

रामपूरचे आमदार आकाश सक्सेना यांनी सांगितले की, एकेकाळी रामपुरी चाकूची दहशत होती. मात्र, सरकारने आता हे कलेचे काम बनवले आहे. हा चाकू प्रिमियम ग्रेड पितळ आणि स्टीलपासून बनवण्यात आला आहे. त्याला गंज लागू नये यासाठीची काळजी घेण्यात आली आहे. ‘सर्वात मोठा चाकू’ म्हणून त्याची गिनिज बुकमध्ये नोंद व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा : 

Back to top button