Earthquake update : पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपात १९ हून अधिक लोकांचा मृत्यू | पुढारी

Earthquake update : पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपात १९ हून अधिक लोकांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये काल (दि.२१) रात्रीच्य़ा सुमारास भूकंपाचे धक्के बसले यात तब्बल १९ जणांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानमधील हिंदुकुश भागात हा भूकंप झाला. याची तीव्रता ६.५ रिश्टर स्केल एवढी होती. अफगाणिस्तानसह भारत आणि पाकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपात अफगाणिस्तानमध्ये आतापर्यंत १० लोकांचा तर पाकिस्तानमध्ये दोन महिलासंह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार पाकिस्तानमध्ये १६० लोक जखमी झाले आहेत. वाचा सविस्तर बातमी. (Earthquake update)
अफगाणिस्तानमध्ये, गृहमंत्री सिरजाउद्दीन हक्कानी यांनी ३४ प्रांताच्या राज्यपालांसह देशातील पोलिस प्रमुखांना भूकंपग्रस्तांना मदत आणि सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अफगाणिस्तानमध्ये राजधानी काबूल त्याचबरोबर इस्लामाबाद आणि लाहोरसह काही शहरांत भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत.

Earthquake update : भारतात सुद्धा भूकंपाचे धक्के

राजधानी दिल्लीसह एनसीआर, गाझियाबाद आणि चंदीगडच्या काही भागांत मंगळवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. हे धक्के सुमारे तीस सेकंदांपर्यंत जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील फैजाबाद शहरात असल्याचे सांगण्यात आले. भूकंपमापन यंत्रावर त्याची तीव्रता 6.6 रिश्टर स्केल नोंदली गेली. दिल्लीखेरीज गाझियाबाद परिसरातही हे धक्के जाणवले. त्यामुळे लोक घराबाहेर सैरावैरा धावत सुटले. काही ठिकाणी या भूकंपामुळे घरांना तडे गेल्याचे वृत्त आहे. सुदैवाने कोणतीही मोठी हानी अथवा जीवितहानी झालेली नाही, असे प्राथमिक वृत्तात म्हटले आहे. (Earthquake in Delhi-NCR)

हेही वाचा 

Back to top button