हिंगोली : मुलीकडे पाहण्यावरून तरुणांमध्ये हाणामारी; बसस्थानकातील प्रकार | पुढारी

हिंगोली : मुलीकडे पाहण्यावरून तरुणांमध्ये हाणामारी; बसस्थानकातील प्रकार

आखाडा बाळापूर (हिंगोली); पुढारी वृत्तसेवा : आखाडा बाळापूर येथील बस स्थानकात गुरूवारी (दि.१६ ) पाचच्या सुमारास मुलीकडे पाहण्यावरून वाद झाला. नशेत असलेल्या तरुणाने बस स्थानकातील तीन-चार लोकांशी वाद करण्यास सुरूवात केली. यावेळी नशेत असलेल्या तरुणाला तीन ते चार लोकांनी जबर मारहाण केली. मारहाण झालेला हा तरुण देववाडी (बोथी, ता. कळमनुरी) येथील असल्याचे सांगण्यात आले.

नशेत असलेल्या तरुणाने रागाच्या भरात स्वताच्याच गळ्यावर दारूची बाटली फोडून जखम करून घेतली. यानंतर तो बसस्थानक आवारात जखमी अवस्थेत होता. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलीस कर्मचारी पंढरीनाथ चव्हाण आणि राजू जाधव यांनी बसस्थानकातील प्रवाशांच्या मदतीने जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार या तरुणावर युवकावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा

Back to top button