Mountain of gold : सोन्याचा पर्वत, पण तेथे गेल्यास मृत्यू निश्चित | पुढारी

Mountain of gold : सोन्याचा पर्वत, पण तेथे गेल्यास मृत्यू निश्चित

कॅलिफोर्निया : अमेरिकेतील अ‍ॅरिझोना येथे असलेल्या सुपरस्टेशन हिल्समधील अत्यंत धोकादायक सोन्याच्या खाणींचे गूढ आजपर्यंत कोणालाही उलगडता आलेले नाही. या खाणी आणि सोने शोधण्यासाठी गेलेल्या शेकडो लोकांना आतापर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे. जे लोक गेले त्यांचे काही दिवसांनी या टेकड्यांवर डोके नसलेले मृतदेह सापडतात, असे सांगितले जाते. अमेरिकन सरकारने या टेकड्यांवर जाण्यास बंदी घातली आहे.

पौराणिक कथेनुसार, जेकब वॉल्ट्झ नावाच्या एका जर्मन स्थलांतरिताने सुपरस्टेशन वाइल्डरनेसमध्ये सोन्याची एक मोठी खाण शोधून काढली आणि 1891 मध्ये मरण पावण्यापूर्वी त्याने ज्युलिया थॉमस या बोर्डिंग हाऊसच्या मालकाला त्या स्थानाबद्दल सांगितले.

काही लोक असेही म्हणतात की, पाताळाकडे किंवा नरकाकडे जाणारे छिद्र या पर्वतांमध्ये आहे. तरीही अनेक लोक सोन्याची खाण शोधण्याचा प्रयत्न करतात. यासाठी त आपला जीवही धोक्यात घालतात.

एकदा काही स्पॅनिश लोक खाणीचा शोध घेण्यासाठी आले. या कामात स्थानिक लोकांनी त्यांना मदत करण्यास नकार दिला, कारण त्यांच्या मते, हा डोंगर म्हणजे देवाचे घर आहे आणि म्हणून पवित्र भूमीवर अतिक्रमण केले जाऊ शकत नाही. तसे केल्यास त्यांना देवाकडून शिक्षा होईल, असा इशाराही देण्यात आला. मात्र, जेव्हा ते खाणीचा शोध घेत होते, तेव्हा स्पॅनिश पथकातील पुरुष रहस्यमयपणे एक एक करून गायब होऊ लागले. नंतर ते मृतावस्थेत आढळले, त्यांचे मृतदेह छिन्नविछिन्न आणि विकृत अवस्थेत होते.

Back to top button