नारायणगावला हजारो शिवभक्त मोटारसायकल फेरीत सहभागी | पुढारी

नारायणगावला हजारो शिवभक्त मोटारसायकल फेरीत सहभागी

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा : राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती सोहळ्याचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला. या निमित्ताने नारायणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करून नारायणगाव- किल्ले शिवनेरी-नारायणगाव अशी मोटारसायकल फेरी आयोजित करण्यात आली. या फेरीमध्ये अनेक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, सरपंच योगेश पाटे, उपसरपंच आरिफ आतार, नारायणगाव विकास सोसायटीचे अध्यक्ष संतोष नाना खैरे, उपाध्यक्ष किरण वाजगे,संतोष वाजगे, नीलेश गोरडे,मुकेश वाजगे,ग्रामपंचायत सदस्य तसेच डॉ. संदीप डोळे, संतोष वाजगे, ज्ञानेश्वर औटी,विकास तोडकरी, भागेश्वर डेरे व अनेक मान्यवर उपस्थित होते.

या फेरीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. आर्वी येथील हायस्कूलचे विद्यार्थी, विद्यार्थिनींनी फुलांचा वर्षाव करत फेरीचे स्वागत केले. जयहिंद ग्रुपच्या वतीने विजय गुंजाळ, जितेंद्र गुंजाळ, धर्मेंद्र गुंजाळ यांनी फेरीचे उत्साहात स्वागत केले. किल्ले शिवनेरी गडावरच्या पायथ्याला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ फेरी आल्यानंतर तिचे स्वागत माजी आमदार शरद सोनवणे तसेच माजी उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, दर्शन फुलपगार यांच्यासह अनेक शिवभक्तांनी केले.

Back to top button