Colonel Geeta Rana : कर्नल गीता राणा यांनी रचला इतिहास; स्वतंत्र फील्ड वर्कशॉपची कमान हाती घेणारी पहिली महिला अधिकारी | पुढारी

Colonel Geeta Rana : कर्नल गीता राणा यांनी रचला इतिहास; स्वतंत्र फील्ड वर्कशॉपची कमान हाती घेणारी पहिली महिला अधिकारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनीअर्सच्या कर्नल गीता राणा यांनी इतिहास रचला. त्या  पूर्व लडाखमधील एका अग्रेषित आणि दुर्गम ठिकाणी स्वतंत्र फील्ड वर्कशॉपची कमान हाती घेणारी पहिली महिला अधिकारी बनल्या आहेत. (Colonel Geeta Rana)

आज प्रत्येक क्षेत्रात आपल्याला महिला भारताचे नाव रोशन करत आहेत. यासोबतच भारतीय लष्करातील महिलाही अतिशय चांगल्या पद्धतीने देशाचे रक्षण करत आहेत.  भारतीय लष्करातील कर्नल गीता राणा यांनी इतिहास रचला आहे. कर्नल गीता राणा यांच्या नावावर मोठी कामगिरी आहे. भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की, कर्नल गीता राणा या पूर्व लडाखच्या फॉरवर्ड आणि दुर्गम भागात फील्ड वर्कशॉपचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. गीता राणा सध्या कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअर्समध्ये कर्नल आहेत. ही जबाबदारी मिळाल्याने गीता राणा यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. लष्करी अधिकाऱ्यांनीही त्यांचे कौतुक केले आहे.

हेही वाचा 

Back to top button