Mumbai weather update : १०, ११ मार्चला सूर्य पुन्हा आग ओकणार; सोमवार ठरला २०२३ मधील सर्वांत उष्ण दिवस | पुढारी

Mumbai weather update : १०, ११ मार्चला सूर्य पुन्हा आग ओकणार; सोमवार ठरला २०२३ मधील सर्वांत उष्ण दिवस

मुंबई: पुढारी वृत्तसंस्था : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईचा पारा वाढला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) सांताक्रूझ वेधशाळेत सोमवारी (६ मार्च) शहरात कमाल तापमान ३९.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. २०२३ वर्षातील हा सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. त्याचीच पुनरावृत्ती १० आणि ११ मार्चला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Mumbai weather update)यंदाच्या वर्षातील सर्वात उष्ण दिवस १८ फेब्रुवारीला नोंदवला गेला होता. तेव्हा ३७.९ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती. मात्र, मार्च महिना उजाडताच अपे- क्षेप्रमाणे तापमान वाढले आहे. मुंबईत मार्च महिन्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान ४१.३ अंश सेल्सिअस आहे. हे तापमान १७ मार्च २०११ रोजी नोंदवले गेले. सोमवारचे तापमान दुसऱ्या स्थानावर आहे.

हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागाच्याअंदाजानुसार, १० मार्चला कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस तसेच किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. दुसऱ्या दिवशी, कमाल तापमान कायम राहणार असून किमान तापमान २६ अंश सेल्सिअस असेल. रविवारी, १२ मार्चला कमाल तापमान ३७ तसेच किमान २६ अंश सेल्सिअस असेल. त्यानंतर पुढील दोन आठवड्यांमध्ये कमाल तापमान ३० ते ३५ अंशादरम्यान असेल, असा अंदाज आहे. त्यामुळे या आठवड्याच्या तुलनेत उन्हाच्या झळा कमी बसतील. समुद्रात उशिरा वाहणारे वारे हे वाढत्या तापमानाला कारणीभूत असल्याचे आयएमडीच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सध्या मुंबईत जोरदार पूर्वेकडील वारे वाहत आहेत, ज्यामुळे मुख्य भूभागाकडे वाहणाऱ्या सागरी वाऱ्याला विलंब होत आहे. यामुळे दैनंदिन तापमानात सातत्याने वाढ होत आहे, असे त्यांनी सांगितले.

Mumbai weather update : अचानक तापमान घसरले!

मुंबई शहर व उपनगरात सकाळी ढगाळ वातावरण होते. मात्र त्यानंतर आकाश निरभ्र होते. दुपारी उन्हाचे चटके जाणवत होते, पण तापमानामध्ये मोठी घट झाली आहे. दोन दिवसांपूर्वी ३९ सेल्सिअसपर्यंत पोहचलेले तापमान ३१.६ सेलि- सअसपर्यंत खाली आले आहे.

हेही वाचा 

Back to top button