डिलिव्हरी बॉय कपिल | पुढारी

डिलिव्हरी बॉय कपिल

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी ‘झ्विगॅटो’ या चित्रपटामुळे कपिल सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटात कपिल ‘डिलिव्हरी बॉय’ च्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटातील त्याचा लूक आधीच रिलीज झाला होता. आता चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. कपिलने इन्स्टाग्राम अकाउंटवर ट्रेलर रिलीज केला आहे. ‘टिंग टाँग… तुमचा विगॅटोचा ट्रेलर रिलीज झाला आहे. कृपया रेटिंग द्यायला विसरू नका,’ असे कॅप्शन कपिलने व्हिडीओला दिले आहे. या चित्रपटात कपिल एका सामान्य माणसाच्या भूमिकेत झळकणार आहे. अभिनेत्री शहाना गोस्वामी कपिलच्या पत्नीच्या भूमिकेत आहे.

Back to top button