या निवडणुकीवर ‘भारत जोडो’ यात्रेचा इफेक्ट : आमदार संग्राम थोपटे | पुढारी

या निवडणुकीवर 'भारत जोडो' यात्रेचा इफेक्ट : आमदार संग्राम थोपटे

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या ‘भारत जोडो या यात्रेचा इफेक्ट पडला आहे, त्यासोबत मध्यमवर्गीयांचा आणी जनतेचे प्रश्न सोडविणारा रवींद्र धंगेकर यांचा चेहरा आम्हाला मिळाला. त्यामुळेच आमचा विजय झाला, असे संग्राम थोपटे यांनी सांगितले. धंगेकर यांच्या विजयानंतर काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेण्यात आली . त्यावेळी थोपटे बोलत होते. यावेळी अभय छाजेड, दीपक मानकर, बाळासाहेब दाभेकर, संगीता तिवार व अन्य उपस्थित होते.

यावेळी थोपटे म्हणाले, आम्हाला जनतेचा कौल मिळाला आहे. कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून विजय खेचून आणला. महापालिकेच्या निवडणूका लांबल्या. मला महापालिकेच्या निवडणूकांसाठी सुद्धा निरीक्षक बनविले. त्यामुळे मी पुढे सुद्धा असेच काम करणार आहे. तसेच, दाभेकर यांनी पक्षाचा आदेश मानत माघार घेतल्यामुळे मोठी हानी टाळली. निवडणूकीपूर्वी उमेदवारांची तुलना केली तेव्हा धंगेकर हे कायमच उजवे दिसत होते. त्यामुळेच आमचा विजय आहे, आता भाजपने स्वत:चे परीक्षण करण्याची गरज आहे. ही निवडणूक एवढी प्रतिष्ठेची का केली, हे मला समजले नाही. मोठ मोठे मंत्री आले. मात्र, त्यांचा काही निभाव लागला नाही. उच्च विद्या विभूषित नागरिकांनी या निवडणुकीत केलेले मतदान आहे, महागाईमुळे जनता वैतागली आहे.

Back to top button