Stock Market Closing | शेअर बाजार अपडेट : IT स्टॉक्सना फटका, SC च्या आदेशानंतर अदानींच्या स्टॉक्समध्ये वाढ | पुढारी

Stock Market Closing | शेअर बाजार अपडेट : IT स्टॉक्सना फटका, SC च्या आदेशानंतर अदानींच्या स्टॉक्समध्ये वाढ

Stock Market Closing : जागतिक कमकुवत संकेतांचा फटका आज गुरुवारी (दि.२) शेअर बाजाराला बसला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे २५० अंकांनी खाली येऊन ५९,१५५ वर होता. निफ्टी १७,४०० च्या जवळ होता. तर दुपारच्या सत्रात सेन्सेक्स ५०० अंकांपर्यंत घसरला होता. त्यानंतर सेन्सेक्स ५०१ अंकांच्या घसरणीसह ५८,९०९ वर बंद झाला. तर निफ्टी १२९ अंकांनी घसरून १७,३२१ पर्यंत खाली आला.

IT स्टॉक्समध्ये घसरण

आजच्या व्यवहारात IT स्टॉक्सना मोठा फटका बसला. यात एल अँड टी टेक्नॉलॉजी (-१.९१), टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (-१.८२ टक्के), इन्फोसिस (-१.६९ टक्के), टेक महिंद्रा (-१.६८ टक्के), MphasiS (-१.४८ टक्के), विप्रो (-०.७४ टक्के), एचसीएल टेक्नॉलॉजीस (-०.४३ टक्के) या शेअर्सचा समावेश होता. निफ्टी आयटी सुमारे १.५ टक्के घसरला.

सुप्रीम कोर्टाकडून दिलासा, अदानी स्टॉक्समध्ये वाढ

अदानी स्टॉक्समध्ये आज सलग तिसऱ्या वाढ दिसून आली. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयात चार जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने सहा सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. यानंतर अदानी समूहाच्या शेअर्सनी आघाडी घेतली. अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन, अदानी विल्मर आणि अदानी पॉवर यांना ५ टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. अदानी एंटरप्रायजेसचा शेअर सुरुवातीच्या व्यवहारात १० टक्क्यांपर्यंत घसरला होता. पण दुपारच्या सत्रात या शेअरने तोटा मागे टाकत तेजीच्या दिशेने वाटचाल केली. हा शेअर १४ टक्क्यांने वाढून १,६४६ रुपयांवर आला. अदानी टोटल गॅस हा शेअर २.६६ टक्क्यांने वाढून ७३२.१५ रुपयांवर पोहोचला. अंबुजा सिमेंट शेअर २.१८ टक्के वाढून ३६१ रुपयांवर गेला. एसीसी (०.०५ टक्के वाढ), एनडीटीव्ही (३.९१ टक्के वाढ) हे शेअर्स वधारले.

हे शेअर्स ‍वाढले

बजाज फायनान्स, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, अल्ट्राटेक, ॲक्सिस बँक, एचडीएफसी, कोटक बँक, इंडसइंड बँक यांनी आज हिरव्या चिन्हात व्यवहार केला. येस बँक, व्होडाफोन आयडिया, आयडीएफसी फर्स्ट बँक, वेदांता हे शेअर्स ‍वधारले. (Stock Market Closing) तर मारुती, अॅक्सिस बँक यांचे शेअर्स प्रत्येकी ३ टक्क्यांनी घसरले.

अमेरिकेसह आशियाई बाजार कमजोर

बाजारातील गुंतवणूकदारांना अमेरिकेतील व्याजदरवाढ आणि महागाईवाढीची चिंता आहे. यामुळे अमेरिकेतील बाजारात कमजोर स्थिती झाली आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारातही घसरण झाली. निक्केई २२५ निर्देशांक ०.०६ टक्के खाली येऊन २७,४९८ वर स्थिरावला. तर टॉपिक्स निर्देशांक ०.१६ टक्के घसरून १,९९४ वर आला.

 हे ही वाचा : 

Back to top button