नगर : राज्य महिला आयोग मंगळवारी जिल्ह्यात | पुढारी

नगर : राज्य महिला आयोग मंगळवारी जिल्ह्यात

नगर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमातंर्गत जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी मंगळवारी (दि. 28) आयोजित करण्यात आली आहे. अधिकाधिक महिलांनी न घाबरता पुढे येऊन तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता अध्यक्षा चाकणकर आणि आयोगाच्या सदस्या तक्रारींची सुनावणी घेणार आहेत.

सुनावणीनंतर त्या जिल्ह्याची आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त, पोलिस अधीक्षक, तसेच आरोग्य, परिवहन, शिक्षण विभागाचे अधिकारी यांना उपस्थित राहाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. या जनसुनावणीवेळी पोलिस प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत.

Back to top button