lightning strike: जळगाव जिल्ह्यात दाेघांचा वीज कोसळून मृत्यू | पुढारी

lightning strike: जळगाव जिल्ह्यात दाेघांचा वीज कोसळून मृत्यू

जळगाव; पुढारी वृत्तसेवा

जळगाव जिल्‍ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्‍ये दाेघांचा वीज अंगावर काेसळून मृत्‍यू झाला. ही तालुक्यातील दुसरी  (lightning strike) तर जिल्ह्यातील तिसरी घटना आहे.

यावल तालुक्यातील न्हावी येथील रहिवाशी असलेला हमीद रूबाब तडवी (वय-४७) याच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, न्हावी शिवारातील जानोरी जंगलात खारबर्डी धरणाच्या पाटचारीजवळ हमीद तडवी हे  शुक्रवारी (दि. १) दुपारी दाेन वाजण्याच्या सुमारास गुरे चारत होते.

हमीद तडवी पाटचारीत पाणी पीत असताना (lightning strike) वीज कोसळली त्यात ते जागीच ठार झाले. त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीने ओरडा- ओरड केल्याने परिसरातील शेतकरी व मजूर तेथे जमा झाले. तातडीने त्यांना यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले.

याप्रकरणी हबीब तडवी ( रा. फैजपूर ) यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ राजेश बऱ्हाटे, श्रीकांत इंगळे करीत आहे. हमीद तडवी याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

मुक्ताईनगर येथील शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू

मुक्ताईनगर येथून जवळच असलेल्या निमखेडी खुर्द येथील शेतकरी वीज कोसळून जागीच ठार आहे. जय रुस्तम घोडकी (वय ३८)असे त्‍यांचे नाव आहे.

अजय रुस्तम घोडकी हे हरताळा शिवारात स्वतःच्या शेतामध्ये काम करत असताना त्यांच्या अंगावर शुक्रवारी दुपारी वीज पडली. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

याआधी ही एकाचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला होता. यामुळे जळगाव जिल्ह्यातील आतापर्यत तिघांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button