जायकवाडी धरणातून गोदावरी नदीमध्ये विसर्ग वाढला (video) | पुढारी

जायकवाडी धरणातून गोदावरी नदीमध्ये विसर्ग वाढला (video)

पैठण; चंद्रकांत अंबिलवादे: पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाल्‍याने शनिवारी सकाळी सात वाजता धरणातून पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. पाटबंधारे विभागाने आपात्कालीन नऊ दरवाजे १.५ फुट उंचीने उघडून यामधून ८९६०४ क्युसेक गोदावरीत पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे आता विसर्गासाठी खुले करण्यात आले आहे.

शुक्रवारी मध्यरात्री पैठण तालुक्यासह जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.

शनिवारी सकाळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव व शाखा अभियंता विजय काकडे यांनी आपात्कालीन १ ते ९ क्रमांकाचे दरवाजे विसर्ग करण्यासाठी उघडण्याचा निर्णय घेतला.

८९६०४ पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सोडला. जायकवाडी धरणाचे सर्वच २७ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

दरवाजा क्रमांक १० ते २७ हे दरवाजे ४ फूट उघडण्यात आले आहे.

आपत्कालीन ९ दरवाजे क्रमांक १ ते ९. १ .५ फूट उघडण्‍यात आले आहेत.

या पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरी नदी आता दुथडी भरून पुन्हा वाहत आहे.

सध्या या धरणामध्ये ८९ हजार २३२ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.

धरणाची ९९.६२ टक्केवारी झाली एकूण जिवंत पाणीसाठा २१६२. ५७७ दलघमी आहे.

पाण्याची आवक कमी-जास्त पद्धतीने सुरू आहे.

90 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू..!

जायकवाडी धरणामधून आज सकाळी ७ वाजता गेट क्र. १ ते ९ असे एकुण ९ गेटस 0 फुटावरुन १.५ फूट उंचीवर उघडण्यात येणार आहेत.

अशाप्रकारे १४१४८ क्यूसेक विसर्ग गोदावरी नदी पात्रात वाढवून 89604 क्युसेक विसर्ग सुरू ठेवण्यात येणार आहे.

१ ते ९ असे एकुण 9 आपात्कालीन गेट हे १.५ फूट उंचीने उडण्‍यात आले आहेत तर १० ते २७ असे एकुण १८ गेट ४ फूट उंचीने उघडण्यात आले आहेत.

हेही वाचलं का ? 

Back to top button